अथांग पसरलेला समुद्र वरून जरी खूप शांत दिसत असला, तरी त्याच्या पोटात खूप रहस्य दडली असतात, ही ओळ नेहमीच आपल्याला कथा-कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळते. हे अनेक अर्थांनी खरंच आहे म्हणा कारण समुद्राच्या पोटात जैवविविधतेचा खजिना लपला आहे. वेगवेगळ्या प्रकारची प्रवाळं, मासे, वनस्पती, जलचर, उभयचर असे अनेक जीव समुद्राच्या पोटात राहातात. यातील प्रत्येकाची आपल्याला माहिती आहे असं नाही. समुद्रात आढळणाऱ्या रहस्यमयी आणि सुंदर जीवापैकी एक म्हणजे तारा मासा. खोल समुद्रात आढळणाऱ्या स्टार फिशचा वाळूत चालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघातात मुलगा गमावलेल्या दाम्पत्यानं ‘अशी’ जिवंत ठेवली त्याची आठवण
एरव्ही किनाऱ्यावर फारच क्वचित दिसणाऱ्या स्टार फिशचा अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ कॅरोलायनामध्ये राहणाऱ्या झेब हॅलॉकानं २०१२ साली चित्रित केला होता. नुकताच झेब यांनी हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला असून तो व्हायरल होत आहे. स्टार फिशना पाच किंवा त्याहून अधिक भूजा असतात. त्यावर ट्यूब फीट असतात. याचा वापर ते सरकण्यासाठी करतात.
किनाऱ्यावर आलेल्या स्टार फिशना ट्यूब फीटवर चालताना क्वचितच कोणी पाहिलं असेल म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.