PM Modi Visit Europe: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बर्लिनला पोहोचले. यावेळी लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी तेथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. यादरम्यान एका छोट्या मुलीने पीएम मोदींना एक पेंटिंग दाखवली, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ व्हायरल

मुलीने पीएम मोदींना हाताने बनवलेले पेंटिंग दाखवले. या पेंटिंगमध्ये पीएम मोदींचे चित्र रेखाटण्यात आले होते. पीएम मोदींनी मुलीला विचारले की हे चित्र बनवायला किती वेळ लागला? तर, मुलीने सांगितले की ते बनवायला जवळपास १ तास लागला. यानंतर पंतप्रधानांनी विचारले की हे चित्र का बनवले? तर मुलीने उत्तर दिले, “कारण तुम्ही माझे आयकॉन आहात.”

(हे ही वाचा: PM Modi Europe Visit: ढोल-ताशे, लेझीम…पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जर्मनीत मराठमोळ्या पद्धतीने झालं स्वागत!)

पीएम मोदींचं जर्मनीत मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत झालं बघा व्हिडीओ:

पीएम मोदींनी दिले आशीर्वाद

यानंतर पीएम मोदींनी मुलीला आशीर्वाद दिले आणि तिच्यासोबत फोटोही काढला. मुलीने काढलेल्या पेंटिंगवर पंतप्रधानांनी त्यांचा ऑटोग्राफही दिला. पंतप्रधानांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video pm modi receives sweet gift from little girl in berlin during 3 europe nation visit ttg
First published on: 03-05-2022 at 12:38 IST