भारतीय लोकं हे जुगाडसाठी म्हणजेच उपलब्ध गोष्टींमधून उपयोगाची गोष्ट निर्माण करुन वेळ मारुन नेण्यासाठी लोकप्रिय आहेत. याच जुगाडची अनेक उदाहरणं व्हिडिओजच्या माध्यमातून वेळोवेळी समोर येत असतात. असाच एक जुगाड सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा जुगाड आहे सायकल चक्कीचा. या सायकल चक्कीच्या मदतीने एकाच वेळी दोन काम करता येतात. पहिलं म्हणजे अर्थात धान्य दळणं आणि दुसरं म्हणजे ते दळता दळता व्यायाम करणं. ही घरच्या घरी बनवलेली सायकल चक्की पाहून ट्विटरवरील अनेकजण इम्प्रेस झालेत हे मात्र खरं.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धान्य दळण्यासाठी वापरण्यात येणारं मशीन व्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या सायकलला कनेक्ट केल्याचे दिसून येत आहे. या सायकलवर एक महिला बसलेली दिसत आहे. सायकल चालवण्यासाठी पॅडलवर जोर लावल्यानंतर हे मशीन काम करुन लागतं आणि धान्य दळलं जातं. या व्हिडिओमध्ये दिसणारी माहिला हे मशीन नक्की कशाप्रकारे काम करतं हे समजवून सांगताना दिसत आहे.

अविनाश शरण या आयएअस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. “भन्नाट शोध आहे. कामही आणि व्यायामही. तसेच या व्हिडिओतील कॉमेंट्रीही शानदार आहे,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडिओ अविनाश यांनी शेअर केला आहे.

या व्हिडिओला सहा लाख ५५ हजारहून अधिक व्ह्यूज आहेत. तर ९०० हून अधिक जणांनी तो शेअर केला आहे. अनेकांनी या महिलेचे कौतुक केलं आहे तर काहींनी थेट ही कुठे विकत घेता येईल अशी विचारणा केली आहे.

कुठे विकत मिळेल?

खूप छान

ऑनलाइन मिळेल का?

भारतीय जुगाड

ग्रामीण भागात वाटा हे यंत्र

याचं पेटंट घ्या

हा व्हिडिओ आणि रिप्लाय पाहून तुम्हालाही या सायकल चक्कीवर धान्य दळायला आवडेल का?