अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारण केल्याच्या आरोपाखाली कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मढ येथे पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या कारवाईचे धागेदोरे राज कुंद्रांपर्यंत येऊन पोहचले आणि त्यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असल्याने तेच या पॉर्न प्रकरणाचे मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सध्या कुंद्रा हे भायखळ्यातील तुरुंगामध्ये आहे. या प्रकरणामुळे भारतातील पॉर्न चित्रपट आणि त्यांच्यावरील बंदी, कायदे, नियम याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. असं असतानाच गुगल ट्रेण्डच्या डेटामध्येही भारतीय मोठ्या संख्येने पॉर्न पाहत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळेच आजकाल अगदी हट्टाने मोबाइल वापरणारे आणि तासनतास मोबाइलवर घालवणारी मुलं सुद्धा हे असं काही बघत नाही ना अशी शंका पालकांच्या मनात येणं सहाजिक आहे. मुलं पॉर्न बघतायत हे सत्य आहे, असं समाजमाध्यम अभ्यासक मुक्ता चैतन्य सांगतात. मुलांना यासंदर्भातील प्रश्न विचारायचे कुठे?, सांगायचे कसे हे समजत नाही आणि दुसरीकडे पालकही मुलं पॉर्न बघतायत हे समजल्यानंतर संभ्रमात पडतात अशी अवस्था निर्माण होते असंही मुक्ता सांगतात. त्यामुळेच मुलं पॉर्न बघत असतील तर हा विषय कसा हाताळावा, पॉर्नपासून मुलांना दूर कसं ठेवायचं आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मुक्ता चैतन्य यांनी दिलीय…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अबक ‘गोष्ट बालमनाची’चे सर्व व्हिडीओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video what to do if your kid is watching porn scsg
First published on: 23-07-2021 at 15:29 IST