VIDEO: महिला साड्यांची खरेदी करत असतानाच बाईक दुकानात घुसली अन्…; थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रविचेट्टू मार्केटमधील असून सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

bike entered the shop
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @jsuryareddy67/ Twitter )

तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही बाइकचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यातील काही बघून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल, तर काहींवर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. कधी कधी विचित्र गोष्टीही घडतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो धक्कादायक आहे. हा व्हिडीओ तेलंगणामधील एका कपड्याच्या दुकानातील आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

दुकानात चार जण बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही क्षणानंतर एक भरधाव बाईक दुकानात शिरते आणि थेट दुकानात उभे असलेल्या लोकांकडे येते. सुदैवाने समोर उभे असलेलेल चारही जण बाजूला होण्यास यशस्वी होतात. मात्र, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दुकानाच्या काउंटरच्या दिशेने पडतो. पण काही सेकंदांनी तो उठतो आणि बाहेर जातो.

( हे ही वाचा: Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली )

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सूर्या रेड्डी नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बाईकने कपड्याच्या दुकानात भरधाव वेगात प्रवेश केला, दुकानातील लोक घाबरले, व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड #Telangana.’

( हे ही वाचा: वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? )

ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रविचेट्टू मार्केटमधील असून सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या ऑडिओवरून मोटारसायकलचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज बांधता येतो. बाईकवरून पडलेल्या माणसाला काय झाले असे विचारले आणि माफी मागितली, तो म्हणाला की ब्रेक निकामी झाला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत भरपूर लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video while the women were buying sarees the bike entered the shop and capturing thrilling scenes on cctv ttg

ताज्या बातम्या