चिनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी वन प्लसच्या स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ट्विटरवर, सुचित शर्मा नावाच्या वापरकर्त्याने दावा केला आहे की वन प्लस नॉर्ड २ ५ जीच्या मॉडेलचा स्फोट झाला आणि या अपघातात त्या फोनच्या मालकाच्या मांडीला भाजलं. कंपनीने मात्र त्यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे.

सुचित शर्मा यांच्या ३ नोव्हेंबरच्या ट्विटनुसार, “हे कधीच अपेक्षित नव्हते. तुमच्या उत्पादनाने काय केले ते पहा (अपघात आणि फोटोंच्या संदर्भात). आता परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करा. तुझ्यामुळे या मुलाला त्रास होत आहे. त्याच्याशी लवकरात लवकर संपर्क साधा.”

मांडीला झाली मोठी जखम

सुचितने या ट्विटसोबत चार फोटो शेअर केले आहेत. दोन फोटोंमध्ये अपघातानंतर खराब झालेला फोन दिसत होता. स्मार्टफोनचा अर्धा भाग मागील बाजूने जळल्यानंतर जुन्या रद्दीसारखा दिसत होता, तर एका फोटोमध्ये जीन्सच्या फॅब्रिकमध्ये जळलेले छिद्र दिसले आणि शेवटचा फोटो पीडितेच्या मांडीचे होते.

( हे ही वाचा: विराट कोहली, रवी शास्त्री आणि भरत अरुण यांचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

यूट्यूबर आणि टेक समीक्षक रणजीत म्हणाले, “आता हे भीतीदायक आहे. वनप्लस नॉर्ड २ मध्ये तिसऱ्यांदा स्फोट झाला आहे. मी आधीच सांगितले आहे की कंपनीचे हे मॉडेल घेणे टाळा. “एका युजरने त्यावर कमेंट केली आणि म्हणाला “मी आज ऑर्डर दिली होती, पण आता रद्द करणार आहे.

( हे ही वाचा: टिकटॉकवरून शिकलेल्या हाताच्या हावभावांमुळे वाचले तरुणीचे प्राण; घरगुती हिंसाचारापासून झाली सुटका )

कंपनी तपास करत आहे

दुसरीकडे कंपनीने या अपघाताबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया ’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाइटला सांगितले की, ‘आम्ही अशा घटनांना गांभीर्याने घेतो. आमची टीम वापरकर्त्याच्या संपर्कात आली आहे आणि आम्ही त्यांच्याकडून तपशील गोळा करत आहोत जेणेकरून या प्रकरणात पुढील कारवाई करता येईल.” विशेष म्हणजे, वनप्लसचा हा तिसरा फोन आहे, जो गेल्या तीन महिन्यांत फुटला आहे. यापूर्वी, एक फोन १ ऑगस्ट २०२१ रोजी स्फोट झाला होता, तर दुसरा स्मार्टफोनचा ८ सप्टेंबर २०२१ रोजी स्फोट झाला होता.

( हे ही वाचा: करीना कपूरच्या दुपट्टा मेरा गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल! )

‘या’ कारणामुळे फुटते बॅटरी

वनप्लसने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. तसेच फोनचा स्फोट होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. पण अनेक तंत्रज्ञान तज्ञ म्हणतात की फोन चार्ज होत असताना त्याच्या आजूबाजूला जास्त रेडिएशन असते. हे देखील बॅटरी गरम होण्याचे एक कारण असू शकते. कदाचित त्यामुळे फोनचा स्फोट झाला असावा. बॅटरी सेल मृत असतानाही, स्मार्टफोनमधील रसायन बदलते, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता असते.