scorecardresearch

Viral: ‘भारतीय बास्केटबॉल संघ या महिलेचा शोध घेत आहे’ IAS अधिकाऱ्याने केला खास व्हिडीओ पोस्ट

हा व्हिडीओ पाहून आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी पोस्ट केला आहे.

IAS officer viral video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @AwanishSharan / Twitter )

देसी जुगाडच्या बाबतीत, भारतीय लोकांना एवढं इतक कुशल क्वचितच कोणी असेल. भारतीय लोक आपली प्रतिभा जगभर दाखवतात. सोशल मीडियावर तुम्हाला नेहमीच असे काही व्हिडीओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये भारतीय आपल्या टॅलेंटने लोकांची मने जिंकतो. जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा कोणाशीही सामना नाही. सध्या एका भारतीय महिलेच्या कौशल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला शेणाच्या गौऱ्या अशाप्रकारे हवेत फुकून भिंतीवर चिकटवते की ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक भारतीय महिला भिंतीवर शेणाच्या गौऱ्या लावताना दिसत आहे. ती ज्या प्रकारे शेणाच्या गौऱ्या हवेत भिंतीवर फेकते आहे ते पाहून कोणाचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. महिलेचे टार्गेट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बाई अगदी नेमक्या पद्धतीने शेणाच्या गौऱ्या टाकत असल्याचे तुम्ही बघू शकता. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: ‘या’ अनोख्या सोनसाखळी चोरांची सोशल मीडियावर होतेय चर्चा; IFS अधिकाऱ्याने शेअर केला Video)

व्हिडीओ पहा-

(हे ही वाचा: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवरचं ‘हे’ गाणं एकदा बघाच; Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

बाईच्या सर्व शेणाच्या गौऱ्या अगदी योग्य ठिकाणी चिकटवल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून आयएएस अधिकारी अवनीश शरण देखील आश्चर्यचकित झाले, त्यांनी हा धक्कादायक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. भारतीय महिलेचा हा १५ सेकंदाचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण या भारतीय महिलेचे कौतुक करत आहेत. आयएएस अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारतीय बास्केटबॉल संघ या महिलेचा शोध घेत आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral indian basketball team is looking for this woman ias officer made a special video post ttg

ताज्या बातम्या