मुंबई पोलिसांनी मंगळवारी वांद्रे वरळी सी लिंकजवळ धोकादायक कार स्टंट केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान जहीर आलम अन्सारी (२७) आणि गुलफाम साबीर अन्सारी (२५) हे सोमवारी रात्री सागरी पुलाजवळ गेले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुलफाम कार चालवत होता तर इम्रान बोनेटवर बसला होता.

रस्त्यावरच्या एकाने व्हिडीओ शूट केला आणि मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग करत ट्विट केल्याने दोघे अडचणीत आले. व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये लोकांचा ग्रुप दिसत आहे, तर एक माणूस बोनेटवर बसलेला दिसत आहे. कारच्या आत बसलेले काही मास्कशिवायही दिसत आहेत.

Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Bathed with alcohol took off shirt and danced on roof of the car video
VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; भररस्त्यात कपडे काढून दारुनं अंघोळ घातली, तेवढ्यात पोलिसांची एन्ट्री अन्…

(हे ही वाचा: Viral Video: लंगड्या कुत्र्याचे धाडस बघून सिंह-सिंहिणीलाही फुटला घाम!)

‘असं’ समजलं पोलिसांना

व्हिडीओ शेअर करताना, संपूर्ण दृश्य शूट करणारा ट्विटर वापरकर्ता अमित पाटील यांने, “कृपया कारवाई करा.” अशी कॅप्शन देत सी लिंकवरून गाडी वांद्रेकडे जात असल्याचे सांगितले. हा व्हिडीओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर तसेच त्याच्या बोनेटवर बसलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की त्यांनी आरोपींना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी कारचे नोंदणी क्रमांक तपासले.

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

(हे ही वाचा: तामिळनाडूमधील राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा रुबाबात चालतानाचा व्हिडीओ Viral)

काय म्हणाले पोलिस?

वांद्रे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक आनंदराव काशीद म्हणाले, “कार नोंदणी क्रमांकाच्या आधारे आम्ही इम्रान आणि गुलफाम यांना कुर्ला येथून अटक केली. दोन्ही आरोपींवर आयपीसी कलम २७९ (घाईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि ३३६ (इतरांच्या जीवनाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला हानी पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: धनाची देवता कुबेराची ‘या’ ४ राशींवर असेल विशेष कृपा; शनीचे संक्रमण ठरेल शुभ आणि फलदायी)

असा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मुंबईतील दोन मोटरसायकलस्वारांना त्यांच्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वेगात आणि धोकादायक गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती.