भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या प्रेरणादायी आणि व्हायरल ट्विटसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींची माहिती ते ट्विटच्या माध्यमातून देताना दिसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळी बाजू दिसते. तर आज त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. बंगळुरूमधील पाणी समस्या लक्षात घेता, त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत एक उपाय सुचवला आहे.

आपल्यातील अनेक जण गर्मीपासून आराम मिळवण्यासाठी घरामध्ये एसी किंवा कूलर लावून घेतात. एसी सुरू असताना त्यातून पाणी गळण्याचे प्रकार अनेकदा आपल्यासमोर घडताना दिसतात; तर आज एसीमधून वाया जाणाऱ्या पाण्यासाठी आनंद महिंद्रानी शेअर केलेल्या व्हिडीओत उपाय सांगण्यात आला आहे. व्हिडीओची सुरुवात बंगळुरूमधील लोकांसाठी एक संदेश देताना होते आहे. एसीमधून गळणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची अनोखी पद्धत दाखवण्यात आली आहे.तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडीओ.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

हेही वाचा…‘द एलिफंट विस्परर्स’मधील ‘रघू’ची आयएएस अधिकाऱ्यांनी घेतली भेट; VIDEO शेअर करीत म्हणाले, ‘तुमच्या मुलांना…’

व्हिडीओ नक्की बघा…

गळणाऱ्या पाण्यासाठी एसीला एक पाईप जोडला आणि त्याला एक नळसुद्धा लावून घेतला आहे. या एका पाईपमध्ये सुमारे १०० लिटर पाणी साठवले जाऊ शकते. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती या संपूर्ण प्रक्रियेचे स्पष्टीकरण देताना दिसत आहे. तुम्ही या पाण्याचा उपयोग अनेक प्रकारे करू शकता. कुंडीतील झाडांना पाणी घालणे, कार धुणे आणि बाथरूम (फ्लश)साठी या पाण्याचा उपयोग तुम्ही करू शकता; असे अज्ञात व्यक्ती व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

तर सोशल मीडियावरील हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि लिहिले की, “भारतात जे लोक एसी (A/Cs) वापरतात तिथे असं उपकरण बनवणे आवश्यक आहे, पाणी ही संपत्ती आहे. त्यामुळे त्याचा योग्य तो साठा करणे गरजेचं आहे. हा व्हिडीओ सगळ्यांबरोबर शेअर करा”; अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत.