Viral Video: उन्हाळ्यात स्वयंपाक घरात जेवण करताना प्रचंड गरम होते. गॅस चालू असल्यामुळे त्यातून निघणारी आग, जेवण बनवताना त्यातून निघणारी वाफ आदी गोष्टींमुळे गृहिणींच्या अंगाची लाही होते. गॅस चालू असल्यामुळे आपण पंखा देखील चालू करू शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात स्वयंपाक घरात जेवण बनवणे कठीण जाते. पण, आज व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने यावर एक उपाय शोधून काढला आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहे. यावेळी गरमी पासून वाचण्यासाठी त्याने टेबल फॅनचा अनोखा जुगाड केला आहे. सगळ्यात पाहिला टेबल फॅनला त्याने स्टूलला बांधले आहे आणि मग तोच स्टूल त्याच्या पाठीवर टांगून ठेवला आहे. फॅनची कॉर्ड सॉकेट बोर्डला जोडलेली दिसते आहे. एकदा पाहाच तरुणाने केलेला हा अनोखा जुगाड.

हेही वाचा…जेव्हा आई पिल्लांना प्रशिक्षण देते; सिंहीण चढली झाडावर अन्… पाहा हृदयस्पर्शी VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, लाकडाच्या टेबलावर पंखा बांधून, व्यक्तीने स्वतःच्या पाठीवर टेबल चिकटपट्टीने टांगून ठेवला आहे आणि पाठीवर पंखा घेऊन तो स्वयंपाकघरातील सर्व कामे करताना दिसत आहे. व्यक्ती पंखा घेऊन जेवणही बनवतो आणि नंतर भांडीही घासतो आहे. त्यामुळे त्याला गरम सुद्धा होणार नाही आणि स्वयंपाकातील काम सुद्धा अगदी चुटकीशीर होतील.

हा जुगाड मजेशीर असला तरीही थोडा धोकादायक सुद्धा वाटतो आहे. पण, हा व्हिडीओ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवला आहे असे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @_audeniosantos या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या जुगाडाचे कमेंटमध्ये कौतुक करताना दिसून येत आहेत.