Viral Video Drunk Dog: सोशल मीडियावर रील्स बघत असाल तर आजवर आपण अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले असतील. एखाद्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ समोर आला तर ज्यांना मुळात कुत्र्याची भीती वाटते अशी लोकंही आवडीने बघतात. काही वेळा हे गोंडस चार पायांचे प्राणी मात्र आपल्या मालकांच्या नाकी नऊ आणतात. अलीकडेच सोशल मीडियावर एका अशाच गोल्डन रिट्रायव्हर कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आजवर आपण अनेकदा दारू पिऊन धिंगाणा करणारी मंडळी पाहिली असतील पण कधी कुठल्या कुत्र्याला दारू पिऊन पाहिलं आहेत का?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कुत्रा जेवणाच्या टेबलपाशी बसून ग्लासातून काहीतरी पित आहे. कदाचित ते पाणी असावे पण त्याच्या समोरच दारूची बॉटल ठेवलेली आहे. त्यानंतर हा कुत्रा अशा एक एक हरकती करतो की त्या बघून याने त्या ग्लासातून समोरच्या बॉटलमध्ये ठेवलेली दारूच प्यायली आहे असे तुम्हीही म्हणाल.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

पुढच्या सेकंदाला या कुत्र्याचे मालक व मालकीण त्याला उचलून जिना चढताना दिसत आहे तर नंतर कुत्रा टॉयलेटमध्ये उलटी करताना दिसत आहे. हे सगळं वाचून तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.. हा व्हिडीओ व्हायरल होताच याला आतापर्यंत १५ हजार लाईक्स व हजारो कमेंट मिळाल्या आहेत.

Video: कुत्र्याचा दारू पिऊन धिंगाणा

हे ही वाचा<< ६० बाळं, ३ बायका.. ५० वर्षीय माणसाचं कुटुंब पाहून व्हाल थक्क; पाकिस्तानात राहून करतो ‘हे’ काम

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपण खूप हसलो असे म्हंटले आहे पण काहींना मात्र हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. अशाप्रकारे स्वतःच्या आनंदासाठी त्या मुक्या प्राण्याशी खेळ करू नये असेही काहींनी कमेंटमध्ये म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दारू पिणाऱ्या व सिगरेट ओढणाऱ्या माकडाचा व्हिडीओ शेअर झाला होता. प्राण्यांना व्यसन करणे कळते का याबाबत आजवर अनेक संशोधने झाली आहेत.