Viral Video: समाज माध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंहाचा कळप हत्ती आणि हत्तीच्या दोन पिल्लांवर हल्ला करण्याता प्रयत्न करताना दिसत आहेत.

जगात आई एवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही लाखो उदाहरण आहेत. ज्यातून मुलांबद्दलचे निस्वार्थ प्रेम दिसून येते. सध्या जंगालातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्यात एक हत्तीण आपल्या जीवाची पर्वा न करता पिल्लांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, हत्तीण आपल्या दोन पिल्लांना घेऊन जंगलात फिरत असून यावेळी अचानक त्यांच्यासमोर सिंहाचा कळप येतो, यावेळी हत्तीण आणि दोन पिल्लांना सिंहाचा कळप चारही बाजून घेरतो आणि वेळ साधून त्यांची शिकार करण्याची वाट पाहतो. यावेळी सिंहाच्या कळपाला पाहून हत्तीणीची दोन्ही पिल्लं तिच्या पायाजवळ जाऊन लपतात. सिंहाचा कळप योग्य वेळ साधून पिल्लांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो परंतु हत्तीण पिल्लांच्या जवळ येणाऱ्या सिंहांना आपल्या सोंडेने पळवून लावते. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी एक आईच हे करू शकते.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Latest Sightings या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर तीन हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आईचे प्रेम खूप अनमोल आहे, याची तुलना कधीच कोणासोबत होऊ शकत नाही.”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आईने करून दाखवलं”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप छान”