आपण जिथे राहतो, जिथे वावरतो तेथील परिसर स्वछ ठेवणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. पण, हे लक्षात न घेता, काही जण बेजबाबदारपणे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. तसेच काही वाहनचालक, काही प्रवासी पान-तंबाखू खाऊन रेल्वेस्थानकावर थुंकताना दिसतात. आज सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे एक महिला सफाई कर्मचारी रेल्वेस्थानकावरील पान-तंबाखूचे डाग स्वच्छ करताना दिसून आली आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक अज्ञात व्यक्ती रेल्वेस्थानकाचा व्हिडीओ शूट करून घेत असते. तेव्हा एक महिला सफाई कर्मचारी रेल्वेस्थानकावरील पान व गुटखा थुंकल्याने खराब झालेला खांब घासून स्वच्छ करताना दिसत आहे. रेल्वेस्थानकावरील या महिला कर्मचाऱ्याजवळ ही व्यक्ती जाते आणि त्यांना “नमस्कार मॅडम, नागरिक असे पान-तंबाखू खाऊन थुंकतात आणि तुम्हाला साफ करावं लागतं, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?”, असा प्रश्न विचारतो. तेव्हा त्या महिला कर्मचाऱ्याकडून काय उत्तर मिळते ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

Volkswagen India has launched the Taigun GT Line and Taigun GT Plus Sport konw features and prices
कुटुंबाला साजेशी SUV पण लूक एकदम Sporty! Volkswagen च्या ‘या’ गाड्यांची किंमत व फीचर्स एकदा पाहाच
an elephant escaped from the circus and run through the streets
VIDEO : सर्कसमधून पळाला हत्ती; भर रस्त्यात धावणाऱ्या हत्तीला पाहून लोकांची उडाली तारांबळ; व्हिडीओ व्हायरल
Girls fight Video
तुफान राडा! भर रस्त्यात मुलींची दे दणादण हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारलं, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल
stray dogs at least five dog attack on kid cctv footage video viral on social media
VIDEO: भयंकर! घाबरून पळणार इतक्यात जमिनीवर पाडलं अन्…; चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला

हेही वाचा…प्रसिद्ध गायक शान अन् ७३ वर्षीय आजोबांची जुगलबंदी, VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस; म्हणाले,

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, महिला सफाई कर्मचारी म्हणते, “सर, माझं हे काम आहे आणि त्यामुळे मला ते करावंच लागतं. नागरिकांना अनेकदा सांगूनदेखील ते सार्वजनिक ठिकाणी, स्थानकावर अशा प्रकारे पान-तंबाखू खाऊन थुंकून ठेवतात. त्यामुळे आम्हाला हे साफ करावं लागतं.” अशा प्रकारे स्वतःचे कर्तव्य बजावताना ती महिला कर्मचारी निराशा व्यक्त करताना दिसून आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असले तरीही देशभरातील शहरांमध्ये अशी उदाहरणे दिसणे ही सामान्य बाब झाली आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहताच आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या व्हिडीओ @AwanishSharan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे आणि जनतेला ‘कृपया हा संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवा’; अशी कॅप्शन देऊन संदेश दिला आहे.