Viral Video: प्रवासादरम्यान गाडी बंद पडली की आपण आजूबाजूच्या परिसरातील इतर वाहनचालकांची मदत घेतो किंवा गाडीला धक्का मारत गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजपर्यंत किंवा पेट्रोल पंपापर्यंत घेऊन जातो. तसेच तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, एखाद्या मित्राला गाडी शिकवण्यासाठी दुसरा मित्र त्याच्या बाईकवर पाय ठेवून त्याला गाडी चालवण्यास शिकवताना दिसतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणाची प्रवासादरम्यान बाईक बंद पडते. पण, हा तरुण इतरांची मदत न घेता रॅपिडो बाईक बुक करतो.

रॅपिडो कंपनी अ‍ॅपवर आधारित बाइक, कॅब्स, टॅक्सी, रिक्षाद्वारे ग्राहकांना सेवा पुरवते. रॅपिडोची ही सेवा भारतातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. तर आज सोशल मीडियावर रॅपिडोशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवासादरम्यान एका तरुणाची बाईक रस्त्यात बंद पडते. आजूबाजूला कोणी मदतीस नसल्यामुळे बहुदा तो ऑनलाइन रॅपिडो बाईक बुक करतो. थोड्या वेळात रॅपिडोचालक तरुणापर्यंत (ग्राहकाकडे) पोहोचतो. तरुणाला बाईकवर बसलेलं पाहून त्याचा गोंधळ उडतो. एकदा पाहाच नक्की पुढे काय घडलं ते.

हेही वाचा…हद्दच झाली राव! धावत्या रेल्वेमध्ये तरुणाने सुरू केला व्यायाम; सहप्रवासी झाले थक्क, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, पण का?

व्हिडीओ नक्की बघा :

रॅपिडो बाईक बुक केलेला तरुण सांगतो की, माझ्या बाईकला पाय लावण्यासाठी मी ही रॅपिडो बाईक बुक केली आहे. तेव्हा रॅपिडोचालकास थोडे आश्चर्य वाटते. पण, तरुणाला मदत करण्यासाठी रॅपिडोचालक तरुणाच्या बाईकला पाय लावून, त्याची गाडी पेट्रोल पंपापर्यंत सोडून येतो. पेट्रोल पंपाजवळ पोहचल्यानंतर तरुण रॅपिडोचालकास पैसे देतो.

रॅपिडो बाईकचालकाने हा मजेशीर अनुभव त्याच्या @gojo_rider या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला ‘दादाने रॅपिडो बोलावून गाडीला धक्का मारायला लावला’ ; अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणाच्या या मजेशीर कल्पनेचं कौतुक, तर अनेक जण रॅपिडोचालकाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.