Viral Video : सार्वजनिक ठिकाणी भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, काही तरुण मंडळी रेल्वेस्थानकावर किंवा ट्रेनमध्ये रील्स बनवून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही जण अश्लील नृत्य किंवा अश्लील चाळे करून रील्स बनवतात आणि मग असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जिथे चक्क एक तरुण ट्रेनमध्ये व्यायाम करताना दिसून आला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ रेल्वेतील आहे. अनेक प्रवासी या रेल्वेतून प्रवास करताना दिसत आहेत. पण, एक तरुण दोन्ही सीटच्या मध्ये असणाऱ्या रॉड्सचा (Rod) उपयोग करून व्यायाम करण्यास सुरुवात करतो. बघता बघता नंतर सीटच्या मदतीने तो पुशअपसुद्धा मारताना दिसून येतो. पाहा धावत्या ट्रेनमध्ये व्यायाम करणाऱ्या या तरुणाचा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…बिल गेट्स यांचा भारत दौरा! स्टॅच्यू ऑफ युनिटीला दिली भेट; VIDEO शेअर करीत केलं भारतीयांचे कौतुक

व्हिडीओ नक्की बघा :

प्रत्येक गोष्ट करण्याची एक जागा ठरलेली असते. जसे की, क्रिकेट खेळण्यासाठी मैदान तसे व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळा. पण, इथे तरुणाने चक्क रेल्वेमध्येच व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे. हा तरुण सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी त्याने हा व्हिडीओ बनवला आहे. तसेच या तरुणाचा अजब प्रकार पाहून सहप्रवाशांना धक्का बसला आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून स्पष्ट दिसून येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Reddit ॲपवरून @indianrailways या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्समध्ये संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “फक्त एकच प्रश्न विचारेन- का?”, तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे, “कोणी तरी आवरा यांना”, अशा अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसून आले आहेत.