वेगवेगळ्या पदार्थ्यांच्या रेसिपी यूट्युब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. एखादा नविन पदार्थ करायचा म्हटलं की, लगेच सोशल मीडियावर सर्च करून तो पदार्थ बनवतात कसा पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसात प्रयोग करून वेगवेगळे पदार्थ तयार केले जात आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार नवे पदार्थ बनवत आहेत. असे पदार्थ बघताना बरे वाटतात. मात्र त्याची चव कशी आहे, हे फक्त ज्याने खाल्लं आहे त्यालाच माहिती असतं. त्यामुळे अशा पदार्थांच्या खाली संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. असाच एक पदार्थ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कँडी क्रश पराठ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
एका फूड ब्लॉगरने दिल्लीच्या चांदनी चौकातील फेमस गल्लीत फेरफटका मारताना हा व्हिडिओ तयार केला आहे. तिथे काही जण कँडी क्रश पराठा खाताना दिसले. त्यानंतर लगेचच ही रेसिपी नेटकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. पराठ्याच्या आत दुकानदार वेगवेगळ्या कँडी आणि जेली भरताना दिसत आहे. त्यानंतर ते डीप फ्राय केला जातो. शेवटी कँडी क्रश पराठ्यासोबत बटाट्याची भाजी, लोणचं आणि चटणी दिली जाते.
व्हायरल व्हिडिओ @chahat_anand नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट्स लिहिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘मोबाईलमधील कँडी क्रश गेमचं लोकांना वेड लागलं आहे. हा पराठा खाऊन वेड लागेल.’ दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘या रेसिपीमुळे लोकं खरा पराठा खाणं विसरून जातील’