तामिळनाडूमधल्या एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहे. एक ट्रक चालकविनाच महामार्गवार उलट्यादिशने गोल फिरत होता. चालक आणि इतर लोकांना या ट्रकवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं होतं. चालक नसतानाही बराचवेळ ट्रक उलट्यादिशने कसा काय फिरत होता याचं राहून राहून कुतूहल लोकांना वाटत होतं, म्हणून अनेकांनी या विचित्र अपघाताचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करण्यासाठी धडपड सुरू केली, अन् अल्पवधीतच या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.

मंगळवारी सकाळच्या सुमारास दिंडीगुल परिसरातील महामार्गावर अपघात घडला. ट्रकचा अपघात झाल्यानंतर ट्रक जागच्या जागी विरुद्ध दिशेनं गिरक्या घेऊ लागला. योग्य वेळ साधून आपले प्राण वाचवण्यासाठी चालकानं ट्रकमधून उडी मारली. कदाचित ट्रक थांबेल असं त्याला वाटलं पण, ट्रक काही थांबलाच नाही. शेवटी चालक आणि त्याचा मदतनीस या ट्रकवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागले. या ट्रकवर नियंत्रण मिळवेपर्यंत या दोघांची चांगलीचं भंबेरी उडाली. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर ट्रकवर नियंत्रण मिळवणं या दोघांना शक्य झालं.