Viral video: अनेकांना भारतीय पदार्थांसह विदेशी पदार्थ चाखायला देखील आवडतात. विशेषत: चायनिज पदार्थ. भारतात चायनीज पदार्थ आवडीने खाल्ले जातात मग ते हाका न्युडल्स, असो की मज्युरिअन.. नूडल्स खायला प्रत्येकाला आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नूडल्स आवडीने खातात. पण कित्येकांना घरी तयार केलेल्या पदार्थांपेक्षा रस्त्यावरील छोट्या स्टॉलवर मिळणारे पदार्थ खायला आवडतात. पण प्रत्येकाच्या आवडीचे असलेले हे नूडल्स कसे बनवले जातात, कुठे बनवले जातात. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याबद्दल तुम्हाला माहित आहे का? याच संबधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि यानंतर नूडल्स खण्याआधी नक्की विचार कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती नूडल्सना नदीच्या किनाऱ्यावर साठलेल्या घाणेरड्या पाण्यात स्वच्छ करत आहे.नदीच्या काठावर मोठं बास्केट हातात पकडून हा व्यक्ती बास्केटमध्ये असणारे नूडल्स पाण्यात बूडवून स्वच्छ करत आहे. दोनवेळा नूडल्स साफ केल्यानंतर तो बास्केट घेऊन तिथून निघून जातो.

नूडल्स किती घाणेरड्या पद्धतीने धुतले जातात ते या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलंय. हा व्हिडिओ प्रचंड पाहिला जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सकाळी शेअर मार्केट अन् दिवसभर रिक्षा; ट्रेडर रिक्षाचालकाचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. तसंच यावर अनेकजण कंमेंट देखील करत आहे. यातील एका युजरने म्हटलंय, ‘हे नूडल्स उकळून तेलात तळले जातात, त्यामुळे अशा उष्णतेत जीवाणू जिवंत राहू शकत नाही’ तसच अनेकजणांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देखील दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of man cleaning noodles in river water is going viral in social media srk
First published on: 04-12-2023 at 16:09 IST