Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. दरम्यान एक चोरीची विचित्र घटना समोर आली आहे. चोर कुणावरही दया दाखवत नाही, जो भेटेल त्याची ते लुटमार करतात. मात्र सध्या एक विचित्र प्रकरण पाहायला मिळालं. यामध्ये चोरांनी चक्क माणुसकी दाखवत त्याच्यावर दया दाखवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

चक्क चोरांनी दाखवली माणुसकी

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
a young guy proposed a girl but she rejected him and ran away
भररस्त्यात प्रपोज करताच मुलगी पळाली अन् तरुण ढसा ढसा रडला, शेवटी लोकांनी दिला धीर; पाहा VIDEO
Video viral of elderly man denied entry at mall for wearing dhoti in Bangalore
धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?
In Zoo Boy dropped his shoe animal picked up the shoe with its trunk and gently returned it to the boy 25 year old elephant Win hearts
VIDEO: प्राणीसंग्रहालयात पडला चिमुकल्याचा शूज; हत्तीने सोंडेने उचलून दिला अन्… कर्मचाऱ्यांनी हत्तीला दिलं ‘हे’ बक्षीस
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
a girl child student sleeping in class watch funny video goes viral will make you remember your school days or childhood
भर वर्गात चिमुकलीची झोप सुटेना! डुलकी घेता घेता शेवटी… पाहा मजेशीर VIDEO

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक डिलीव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी एका घराच्या बाहेर येतो आणि पार्सल देऊन पुन्हा बाईकजवळ येतो. यावेळी पाठीमागून दोन चोर दुचाकीवर येतात आणि डिलीव्हरी बॉयजवळचे सर्व पैसे वस्तू घेतात. त्यानंतर डिलीव्हरी बॉयला रडू येतं आणि तो रडू लागतो, तसेच चोरांना हात जोडून विनंतीही करताना दिसत आहे. यावेळी चक्क चोरांनी या डिलीव्हरी बॉयची दया येते आणि ते सर्व सामान आणि पैसे परत करतात आणि त्याला धीर देतात. त्याला रडू नको असं सांगतात हात मिळवतात. चोरांनी दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “मुलगी जेव्हा वडिलांच्या नजरेत जिंकते ना…” पोलीस लेकीचं कौतुक करताना अश्रूंचा बांध फुटला; मुलीलाही अश्रू अनावर

हा व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “विश्वास ठेवणे कठीण आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हा चोर पकडला गेला आहे का?” या व्हिडीओवर आणखी मनोरंजक प्रतिक्रिया आल्या आहेत.