scorecardresearch

Premium

मंच्युरिअन खायला आवडतात का? मग एकदा हा व्हिडीओ बघाच! पुन्हा मंच्युरिअन खाण्यापूर्वी १०० वेळा कराल विचार

सध्या अशाच एका ५०० किलोचे मंच्युरिअन तयार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून खाद्यप्रेमींनी धक्का बसला आहे

Viral Video Of Manchurian Making Upsets Internet
मंच्युरिअन तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल ( फोटो : Instagram/@the__bearded__foodie)-

भारतीय लोक खवय्ये आहेत. अनेकांना भारतीय पदार्थांसह विदेशी पदार्थ चाखायला देखील आवडतात. विशेषत: चायनिज पदार्थ. भारतात चायनीज पदार्थ आवडीने खाल्ले जातात मग ते हाका न्युडल्स, असो की मज्युरिअन. हे चायनीज पदार्थ तयार करणे काही फार अवघड नाही. गाजर, कोबी, कांदा, मक्याचे मीठ, मीठ तेल आणि न्युडल्स अशा काही मोजक्या पदार्थांपासून झटपट तयार केला जातात. पण कित्येकांना घरी तयार केलेल्या पदार्थांपेक्षा रस्त्यावरील छोट्या स्टॉलवर मिळणारे पदार्थ खायला आवडतात. विशेषत: मंच्युरिअन. पण रस्त्यावरील स्टॉलवर मिळणारे मंच्युरिअन खाताना तुम्ही स्वच्छतेचा विचार कधी करता का? गेल्या काही दिवसांपासून फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका ५०० किलोचे मंच्युरिअन तयार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून खाद्यप्रेमींनी धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओ the__bearded__foodieया इंस्टाग्राम अकांऊटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की “जर तुम्हाला मंच्युरिअन आवडत असेल तर हा व्हिडीओ पाहू नका” व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की, काही लोक मोठ्या प्रमाणात कोबी चिरत आहे. दरम्यान, त्यांच्यामध्ये मोठे चाकू आहे ज्याने ते कोबी अगदी बारीक चिरत आहे. त्यानंतर चिरलेला कोबी एका कॅरटमध्ये भरला जात आहे नंतर तो एका मोठ्या भांड्यामध्ये टाकला जातो. त्यात मीठ आणि मक्याचे पीठ टाकून मिश्रण तयार केले जात आहे. हे मीश्रण तयार करणार व्यक्ती थेट हातानेच सर्व काही करत आहे. हवे तसे मिश्रण झाल्यानंतर त्याचे छोटे गोळे तयार केले जात असून एका मोठ्या कढईमध्ये तळण्यासाठी टाकले जातात. त्यानंतर गरमा गरम तळललेले मच्युरिअन एका कॅरेटमध्ये टाकले जातात.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Turn any YouTube video convert into a GIF Just using Three Tools Know The Step By Step
तुमच्या आवडत्या युट्यूब व्हिडीओचे करा GIF मध्ये रूपांतर; फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो
an old lady wish to do makeup before going to chemotherapy
उद्याची वाट पाहू नका, प्रत्येक क्षण जगा! केमोथेरपी करण्यापूर्वी आजीची होती मेकअप करायची इच्छा, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – बंगळुरू नव्हे, गुरुग्राम आहे हे! प्रंचड मोठ्या वाहतूक कोंडीचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

हेही वाचा – भलतं धाडस पडलं महागात! तरुणांनी थेट नदीत उतरवली कार अन्….; थरारक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. व्हिडीओला आतापर्यंत ५ मिलीयन पेक्षा जास्त वेळा पाहिले आहे. अनेकांना खाद्यप्रेमींनी व्हिडीओ पाहून टिका केली आहे. एकाने लिहिले, “यात स्वच्छता कुठेही नाही.”, तर दुसऱ्याने लिहिले की, “मी जितके असे व्हिडीओ पाहतो तितके मी फास्ट फूड खाणे टाळतो.” तिसऱ्याने लिहिले की, “स्वच्छता एका कोपऱ्यात ठेवून दिली आहे.” चौथ्याने लिहिले की, “मिश्रण एकत्र करताना त्याच्या शरीराचा अर्धा भार जवळपास त्यात जात होता.”
t.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of manchurian making upsets internet snk

First published on: 08-10-2023 at 13:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×