scorecardresearch

या माकडाच्या स्माईलची साऱ्या जगाला भुरळ पडली, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल

आज आम्ही तुम्हाला माकडाचा एक अतिशय गोंडस व्हिडीओ दाखवणार आहोत. ज्यामध्ये माकड आपली सुंदर स्माईल दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्माईल येईल हे नक्की.

Monkey-Smile-Video-Viral
(Photo: Instagram/ animalsinworldwide)

प्राण्यांचे खूप अनोखे आणि मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात, जे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होतो. कधी कधी इंटरनेटवर अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या प्रेक्षकांनी याआधी कुठेही पाहिल्या नसतील. यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ सर्वाधिक पसंत केले जातात. खोडकर आणि हुशार प्राण्यांची यादी केली तर माकडाचे नाव सर्वात आधी येतं. त्यामुळे इंटरनेटवर माकडांचे व्हिडीओ रोज धुमाकूळ घालत आहेत. आजही आम्ही तुम्हाला माकडाचा एक अतिशय गोंडस व्हिडीओ दाखवणार आहोत. ज्यामध्ये माकड आपली सुंदर स्माईल दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल हे नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक माकड त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल देताना दिसून येत आहे. माकडाची ही दिलखेचक स्माईल पाहून तुम्हीही ही या माकडाच्या प्रेमात पडाल. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये कॉमेंट्री म्युझिक जोडण्यात आलं आहे. ते ऐकून तुम्हाला हसूच फुटेल. या व्हिडीओमध्ये असे म्हणताना ऐकू येते की, “मी या गावातील सर्वात देखणा आणि सुंदर व्यक्ती आहे, त्यामुळे गावातील प्रत्येकाला आमचा हेवा वाटतो. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.”

आणखी वाचा : सलूनमध्ये या व्यक्तीने बनवली विचित्र हेअरस्टाईल, VIRAL VIDEO पाहून लोक भडकले

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram च्या animalsinworldwide अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. प्रेक्षक या माकडाच्या स्माईलचे चाहते झाले असून त्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.

आणखी वाचा : लग्नातला नागिन डान्स नव्हे तर खऱ्या किंग कोब्राचा रोमँटिक डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तरुणांनी रस्त्यावर घातला गोंधळ, मग पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा VIRAL VIDEO

दर्शक देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत आणि व्हिडीओवर कमेंट करण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीत. एका युजरने “मेरा यार हंस रहा है बारिश की जाए” असे म्हटले आणि दुसऱ्या युजरने म्हटले की “ही एक अतिशय गोंडस स्माईल आहे”. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of monkey beautiful smile watch full video you will also start smiling prp

ताज्या बातम्या