आपली स्वतःची एक कार असावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं. तुम्ही तुमचं हे स्वप्न सत्यात उतरवाल, पण अनेकांचं हे स्वप्न क्षणभंगुर ठरतं. स्कोडा, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज… कोणतीही आणि कितीही महागडी कार असू देत, चोरांसाठी सगळ्याच सारख्या. कारचोर अगदी काही मिनिटांत कार पळवितात. कधी डुप्लिकेट चावी वापरून, कधी स्क्रू ड्रायव्हरने काच उचकटून…सध्या तर ऑटोमॅटिक लॉकही सहज तोडले जातात. चोरांचे नवनवीन ‘कारनामे’ पाहता एका पठ्ठ्यानं आपली नवी कोरी कार चोरट्यांपासून लपवण्यासाठी एक असा जबरदस्त जुगाड केलाय, तो पाहून तुम्ही सारेच जण हैराण व्हाल. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “वाह, काय जबरदस्त आयडिया आहे…!”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवी कोरी कार चोरट्यांपासून लपवण्यासाठी एक अनोखी शक्कल वापरली आहे. फक्त गाडी खरेदी करून चालत नाही, तर त्याची चोरांपासून काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या पठ्ठ्याने एक असा जुगाड वापलाय ज्याने कार चोरणाऱ्या चोरट्याला सुद्धा वेड्यात काढलं जाईल. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक खटारा आणि जुनी झालेली कार दिसून येत आहे. या कारला पाहून ती काही दिवसात भंगारात जाईल, असंच वाटू लागतं. जवळजवळ २०-३० वर्षापूर्वीची ही खटारा कार असल्याचं वाटू लागतं. जणू काही एका अपघातात ही कार पूर्णपणे खिळखिळी झाली आणि इथे बाजुला उभी केली आहे. असंच सारं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल, हो ना ? पण थोडं थांबा…कारण दिसतं तसं नसतं. होय. या व्हिडीओमध्ये पुढे जे दिसतं ते पाहून तुम्ही काय चोर सुद्धा चक्रावून जाईल.

या व्हिडीओमध्ये थोड्या वेळाने एकाची एन्ट्री होते. तो फ्रेममध्ये येतात व्हिडीओमधलं खरं रहस्य दिसून येतं, जो या व्हिडीओमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. हा व्यक्ती या जुनाट कारच्या मागच्या बाजुला जातो आणि काही तरी हाताने पकडत ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर या जुनाट कारचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून जातो. खरं तर, या व्हिडीओमध्ये सुरूवातीला जी जुनाट कार दिसली ती कार नव्हे तर कारचं कव्हर होतं. या कारच्या कव्हरने नवी कोरी कार झाकली होती.

आणखी वाचा : टांझानियाच्या ‘त्या’ तरुणाने सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर केलं लिपसिंक; VIRAL VIDEO पाहून लोक भारावले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरा नवरीची स्टेजवर थरारक एन्ट्री; झुल्याचा दोर तुटला, अन् १२ फूट उंचीवरून धाडकन कोसळले आणि मग…

हल्ली कार चोरीच्या अनेक घटना घडत असून चोरांपासून ही नवी कार लपवण्यासाठी असा जुगाड केल्याचं नंतर कळतं. अशा कव्हरमुळे नव्या कोऱ्या कारला ज्यापद्धतीने जुनाट कारचं रूप दिलं गेलंय, ते पाहून चोर या कारच्या अगदी आजूबाजूला सुद्धा फिरणार नाही. या अनोख्या जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : प्रेम असावं तर असं…! कोंबडीला घेऊन जाणाऱ्या माणसासोबतच भिडला कोंबडा! पुढे काय झालं ते पाहाच…

‘bhutni_ke_memes’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चोरांपासून कारला लपवण्यासाठी वापरण्यात आलेली ही अनोखी शक्कल लोकांना खूपच आवडली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू देखील आवरत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो इतर ठिकाणी शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं असून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.