अनेकदा असं म्हटलं जातं, की माणसाचं नशीब चांगलं असेल तर अगदी मोठी अडचणही सहजरित्या तो पार करतो. मग तो मृत्यूही असो. अनेकजण मृत्यूच्या दारातून परत आल्याचं आपण ऐकलं असेल. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हायवेवर धावणाऱ्या मिनी ट्रकचे चाक एक्सलसह बाहेर आले आहे. एक्सलसह निघालेलं हे चाक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या अगदी जवळ आला होता, पण नंतर एक असा चमत्कार घडला जो पाहून सारेच जण हैराण होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ काही वेळात लाखो लोकांनी पाहिला आहे आणि ७५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक सुद्धा केलं आहे.

ही संपूर्ण घटना रस्त्यावरच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महामार्गावर मिनी ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. मात्र, त्याच दरम्यान त्याचे मागचे चाक एक्सलसह वाहनापासून वेगळे होऊन दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या दिशेने येऊ लागलं. चाक त्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून ती व्यक्ती भयंकर घाबरलेली दिसून येते. आपल्या समोर हे एक्सलसह येणारं चाक पाहून हा व्यक्ती आहे त्याच जागी उभा राहतो. अचानक काय करावं हे त्याला काही सुचत नाही. नंतर असा काही चमत्कार घडला की त्या व्यक्तीला साधा ओरखडाही आला नाही.

आणखी वाचा : गुलाबी थंडीत ब्लँकेटच्या आत मुलगी जे करत होती ते पाहून आई हैराण झाली, पाहा हा VIRAL VIDEO

खरं तर, भरधाव वेगाने येणारं चाक त्या व्यक्तीच्या समोरील लोखंडी पाईपला धडकलं आणि मग ते पुन्हा मागे पडलं. त्यामूळे या घटनेत या व्यक्तीला ओरखडाही आला नाही. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती… असं म्हणतात ते काही खोटं नाही. अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपात याचा प्रत्ययही येत असतो. असाच प्रत्यय या व्यक्तीला सुद्धा आला.

आणखी वाचा : पेटिंग करणारा हत्ती कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कंटेनरमधून थेट ट्रकच्या छतावर पोहोचली ही गाय, पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर केल्या केल्याच सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ एकदा पाहून कुणाचंच समाधान होत नाही म्हणून वारंवार हा व्हिडीओ पाहून मृत्यूच्या अगदी जवळ आलेला हा व्यक्ती कसा वाचला हे निरखून पाहू लागले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा म्हशीला राग येतो…, असा केला हल्ला की सारेच जण गेटमधून बाहेर पडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात तासांपूर्वीच हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. मात्र अवघ्या सात तासात या व्हिडीओला १.२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत.