Viral Video: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे अनेक जण फिरायला जाण्याचे किंवा गावी जाण्याचे प्लॅन करतात, त्यामुळे रेल्वे प्रशासन दिवसेंदिवस प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रयत्न करत आहेत. पण, एक्स्प्रेसने प्रवास करणारे लाखो प्रवासी असतात. त्यामुळे या सिझनमध्ये प्रवशांचे हाल होताना दिसत आहेत. काही जणांना तिकीट मिळत नाही, तर प्रवास करताना गाड्या प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे प्रवासादरम्यान महिला प्रवाशाचे हाल होताना दिसत आहेत.

एक तरुणी २२९६९ ओखा बीएसबीएस एसएफ एक्स्प्रेसने (ओखा ते कानपूर) प्रवास करीत असते. पण, ती गर्दीमुळे कोच बदलण्याची टीटीई (ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर) कडे विनंती करताना दिसत आहे. तरुणी ज्या कोचमधून प्रवास करीत असते तिथे प्रचंड गर्दी असते आणि डबा फक्त पुरुष प्रवाशांनी भरलेला असल्याने तिला खूप अस्वस्थ वाटत असते. त्यामुळे महिलेने टीटीईला विनंती केली की, ‘एखाद्या मुलीला किंवा महिलेला असा प्रवास करणे खूप कठीण आहे’, तर तरुणीच्या विनंतीवर टीटीईने काय उत्तर दिलं एकदा व्हायरल व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…मतदान जनजागृती मोहीमेसाठी तरुणांचा अनोखा उपक्रम; ६० फूट खोल समुद्रात मारली उडी अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणी कोच बदलण्यासाठी टीटीईकडे विनंती करत असते. पण, तरुणीचं बोलणं ऐकून टीटीई हात जोडतो आणि म्हणतो की, ‘मी रेल्वे मंत्री नाही, त्यामुळे मी या प्रकरणात काहीच करू शकत नाही किंवा प्रवाशांसाठी जास्त गाड्यांचा बंदोबस्त करू शकत नाही’; असे म्हणताना दिसत आहे. हे ऐकून तरुणी उत्तर देते की, ‘रेल्वे अधिकाऱ्यांना फक्त त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे, महिला किंवा प्रवाशांच्या सुरक्षेची नाही…’

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gunsnrosesgirl3 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान तिकीट तपासणे, आयडी पाहणे, प्रवासी योग्य ठिकाणी बसले आहेत की नाही, प्रवाशांना योग्य जागा मिळाली की नाही, प्रवाशांना काही अडचण आहे की नाही; हे पाहण्याचे काम टीटीईचं असते. पण, या व्हिडीओत प्रवाशांची गैरसोय समजून न घेता टीटीई दुर्लक्ष करताना दिसत आहे.