सोशल मीडियावर काय, कधी आणि कसं व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा सोशल मीडियावर जुने व्हिडीओ अचानक व्हायर होऊ लागतात. तर कधी नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव्हर व्हायरल होताना दिसतो. त्यातही अनेकदा जंगलांमधील शिकारीचे किंवा प्राण्यांमधील संघर्षाचे व्हिडीओ तर अनेकदा अशा व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून जंगलामधील एक शिकार कॅमेरात कैद झालीय.

सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजेच तो शक्तीमान असतो तोच टिकून राहतो या जंगलराजच्या नियमांनुसार जंगलातील कारभार चालतो. जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. येथे जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. अशीच एक आश्चर्यचकित करणारी शिकार एका सिंहणीने केलीय ज्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

एक रानडुक्कर जंगलामधून चालत असताना अचानक दोन सिंहिणी त्याच्यावर हल्ला करतानाचा थरार कॅमेरात कैद झालाय. या व्हिडीओ खरा तर एक महिना जुना आहे पण तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेमधील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये शूट करण्यात आलाय. शॅनन फिनेगन या व्यक्तीने हा शूट केलाय.

या व्हिडीओमध्ये जंगलामधील एका पायवाटवजा रस्त्यावर एक रानडुक्कर चरत असताना दिसतंय. मात्र त्याचवेळी या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कंबरभर उंचीच्या गवतामध्ये दोन सिंहिणी योग्य संधीची वाट पाहत असल्याचं दिसतं. जसं हे रानडुक्कर टप्प्यात येतं तसं या सिंहिणी हल्ला करतात. या डुक्कराला संकटाची चाहूल लागताच ते पळू लागतं. तेवढ्यात एक सिंहिण त्याचा पाठलाग करु लागते. थोड्या अंतरावरच गवतामधून अचानक दुसरी सिंहिण येऊन या रानडुक्कराचा फडशा पाडते. हे सारं अवघ्या २० सेकंदांमध्ये घडलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला ९४ लाख ६६ हजार व्ह्यूज आहेत.