मागच्या अनेक दिवसांपासून रेडिओ जॉकी मलिष्काचा मुंबईतील खड्डे आणि मुंबई महानगरपालिका यांच्याशी निगडित व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचवेळी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो म्हणजे मुंबईच्या खड्ड्यांचे कौतुक करणारा. आता खड्डे म्हटल्यावर कौतुक कसे काय?  पण हो उपहासाने या सगळ्या प्रकऱणाचे कौतुक करत त्याने परिस्थिती जवळून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या जोस कोव्हाको या व्हिडिओ जॉकीने हा व्हिडिओ शूट केला असून त्याने तो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर अपलोड केला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून रेडिओ जॉकी मलिष्काचा मुंबईतील खड्डे आणि मुंबई महानगरपालिका यांच्याशी निगडित व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचवेळी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो म्हणजे मुंबईच्या खड्ड्यांचे कौतुक करणारा. आता खड्डे म्हटल्यावर कौतुक कसे काय?  पण हो उपहासाने या सगळ्या प्रकऱणाचे कौतुक करत त्याने परिस्थिती जवळून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या जोस कोव्हाको या व्हिडिओ जॉकीने हा व्हिडिओ शूट केला असून त्याने तो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर अपलोड केला आहे.

विशेष म्हणजे त्याच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्सही मिळाले आहेत. ट्वीटरवर अवघ्या २० तासात त्याला १२ हजार लाईक्स मिळाले असून ९ हजार जणांनी त्याचा हा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सातत्याने प्रशासनाविरुद्ध बोलणाऱ्या मुंबईकरांना लाज वाटली पाहिजे असेही त्याने उपहासाने म्हटले आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात फिरुन त्याने आपला हा व्हिडिओ केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार एखादा खड्ड्यात साचलेले पाणी हे विशेष असून दमलेले पक्षी आणि इतरांसाठी तयार करण्यात आलेला  चहा आहे.  लिलावती रुग्णालयाच्या जवळ असणारे खड्डे, त्यामुळे साचणारे पाणी आणि त्यावरील डास हे अजिबातच त्राासदायक नाहीत असे तो उपहासाने म्हटला आहे. याशिवाय प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्या घरासमोर असणारे खड्ड्यातील डिझाईन हे रस्त्यावरील सर्वोत्तम डिझाईन असल्याचे त्याने म्हटले आहे.

त्याच्या या विडंबनात्मक कल्पक व्हिडिओला ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. या खड्डांमध्ये साचलेल्या कचरा आणि पाण्यातून कसा चांगला भाज्यांचा आणि फळांचा वास येत आहे असेही तो म्हणतो. साचलेले खूप सारे पाणी आपल्याकडे असून त्यात अजिबात डास नाहीत आणि विशेष म्हणजे या पाण्यात डासही मरतात असे तो म्हणतोय . खड्ड्यांमुळे वाहनांतून जाणाऱ्या प्रवाशांचे कशापद्धतीने हाल होतात हे दाखविताना जोस म्हणतो हे खड्डे नसून ते  हायटेक स्पीडब्रेकर आहेत. त्यामुळे प्रवास करताना आपल्या इथले प्रवासी अतिशय सुरक्षित असल्याचे तो म्हणतो. त्यामुळे आपल्याला इतक्या सगळ्या सुविधा मुंमईत मिळत असताना अशा प्दधतीने प्रशासनाला नावे ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. याठिकाणी सगळे परफेक्ट असताना अशापद्धतीने नावे ठेवणे योग्य नाही.