Doctor Emotional Video Viral : डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते. कारण- तेच एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतात, त्याला जगण्याची नवी उमेद देतात. पण जेव्हा सर्व प्रयत्न करूनही एखाद्या रुग्णाचा जीव वाचावता येत नाही तेव्हा डॉक्टरला काय वाटत असेल, तो काय विचार करीत असेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण- आपण देवाकडे आपली व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावा यासाठी प्रार्थना करीत असतो, त्याप्रमाणे डॉक्टरांकडूनही रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी पर्यत्न सुरू असतात; पण अनेकदा कितीही प्रयत्न करून रुग्णाचा जीव वाचवणं शक्य होत नाही. अशा वेळी कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळतोच; पण त्या कुटुंबाचे दु:ख पाहून डॉक्टरांना वाईट वाटत असते. य परिस्थितीबाबत टेनेसीचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी एखाद्या रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर काय परिस्थिती ओढवते यावर भाष्य केलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या छोट्या व्हिडीओत डॉ. यारानोव्ह शांतपणे ऑपरेशन रुग्णाच्या रूममधून बाहेर येताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांचा चेहरा दुःखात बुडालेला दिसतोय आणि त्याच स्थितीत ते अंगावरील अॅप्रनसहित ऑपरेशन थिएटरमधील वापरावयाचे कपडे एकेक करून उतरवताना दिसतायत. ते हताश झाल्याचे स्पष्टपणे दिसतायत. रुग्ण गमावल्यानंतर काय स्थिती असते हे स्क्रीनवर लिहिलेलं आहे. त्यासाठी कोणीही तयार नाही.

व्हिडीओसह दिलेल्या कॅप्शनमध्ये डॉ. यारानोव्ह यांनी लिहिले की, मी रडतो. मी स्वतःला दोष देतो. झालेलं नुकसान मला सहन होत नाही. खरे सांगायचं तर, हे मोठ्यानं सांगण्यासाठी मला १६ वर्षं लागली. मी त्या रुग्णाच्या खोलीतून बाहेर पडतो, नर्सला शांतपणे मान हलवून इशारा करतो आणि नंतर दुसऱ्या रुग्णाच्या खोलीत जातो. यावेळी मी ज्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होतो, तो अजूनही जिवंत आहे, असा एकूण माझा भाव असतो; पण जेव्हा कोणी दिसत नाही, तेव्हा मी माझ्या गाडीत, कॉल रूममध्ये, कधी कधी स्टोअर रूममध्ये असतो तेव्हा खूप खचतो, कोसळल्यासारखे वाटू लागते.

मी रडतो. मी प्रत्येक गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतो. मी स्वतःला दोष देतो, व्यवस्थेला दोष देतो. मला वाटत राहते की, मी कुठेतरी काहीतरी चुकलो तर नाही ना? मी अजूनही चांगला डॉक्टर आहे का? की कधी होतो? मला झालेलं दु:ख फक्त माझ्या मनालाच नाही, तर माझ्या शरीरालाही जाणवते. अगदी शांतपणे झालेलं दु:ख सहन करीत राहतो; पण कधी व्यक्त करीत नाही, त्याच दु:खासह मी फक्त पुढे जात राहतो. कारण- मी खूप काळजी करीत असतो. अजूनही करतो.

डॉक्टरांचा हा भावनिक व्हिडीओ आतापर्यंत १.२ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे; तर त्यावर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक डॉक्टर, नर्स आणि सामान्य लोकांनाही डॉक्टरांचे हे शब्द वाचून भावना अनावर झाल्या. अनेकांनी ही डॉक्टरांची सर्वांत प्रामाणिक पोस्ट असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी कोणीतरी म्हटले की, मी एक नर्स आहे, मी हे दुःख जवळून पाहिले आहे. तुम्ही एकटे नाही आहात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणीतरी म्हटले आहे की, डॉक्टर देवदूत आहेत; पण देव नाहीत. प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावेच लागते हे मान्य केले पाहिजे.