Emotional video: आपल्या लेकरानं शिक्षण घेऊन खूप मोठं व्हावं आणि आपलं नाव कमवावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. लेकराच्या यशासाठी अनेक अडचणींचा पालकांना सामना करावा लागतो. पदराला मूरड घालून आई आपल्या लेकराला मोठं करत असते. मुलं जेव्हा यशस्वी होतात. समाजात नाव कमावतात आणि लाखो रुपयांची पॅकेजेस घेऊ लागतात तेव्हा आपल्या यशासाठी आई-वडिलांनी केलेली मेहनत मुलांनी कधीच विसरता कामा नये. मुलांसाठी भोगलेली संकटं किंवा करावे लागलेले कष्ट यामागे आई-वडिलांची फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या लेकरानं मोठं व्हावं. इतर कोणतीच इच्छा आई-वडिलांच्या मनात नसते. ज्या आईमुळे आपण आज सुख-सोयी उपभोगत आहोत त्याची अनुभूती एकदा तरी आईलाही मिळावी यासाठी एका मुलानं उचललेलं पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मात्र एका तरुणानं परदेशात स्थायिक झाल्यानंतर त्याच्या आईला आपल्या परदेशातील घरी नेताना मुलाने जबरदस्त स्वागत केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या तरुणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने आईला विमानतळावरून बाहेर आणलं त्यानंतर त्यांच्या गाडीत बसवून घरी आणलं. आई पहिल्यांदा परदेशात आली होते, त्यामुळे त्यांचं वेगळ्या पद्धतीने स्वागत करायचं अशी त्यांती इच्छा होती. त्याचप्रमाणे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आईचं स्वागत मुलानं केलं. आपल्यासाठी उभं आयुष्य ज्यांनी कष्ट केले त्यांना चांगले दिवस दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक मुलगा बघतो, यावेळी आईच्या चेहऱ्यावरील आनंदही खूप काही सांगून जातो.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

हा व्हिडीओ शेअर करत या मुलानं “Finally आई आली Qatar ला❤️?…??✈️??माझी साधीभोळी आई पहिल्यांदा भारता बाहेर आली.” असं कॅप्शन लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: पिल्लाला वाचवण्यासाठी आईची मृत्यूशी झुंज, थराराक व्हिडीओ पहा…

याची दुसरी बाजू म्हणजे जुन्या लोकांना कोणत्याही ठिकाणी नेलं तरी गाव मात्र सुटत नाही. अशावेळी गड्या आपलं गावचं बरं म्हणत पुन्हा गावी जातात. मात्र पुन्हा मुलांच्या आठवणीने त्यांना एकटेपण येत.