जर तुम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) च्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करत असाल, तर तुम्हाला अनेकदा ते शेअर करत असलेले वेगवेगळे भन्नाट व्हिडीओंविषयी तुम्हाला माहिती असेलच. वेगवेगळे आश्चर्यकारक वर्ल्ड रेकॉर्ड रचणाऱ्या लोकांचे अनेक पराक्रम पाहून लोक थक्क होत असतात. यात स्टेफनी मिलिंगर या ऑस्ट्रियन धावपटूने एल-सीट पोजिशनमध्ये बसून आणखी एक विश्वविक्रम रचला आहे. तब्बल पाच मिनिटं आणि १५ सेकंद एल सीट पोजिशनमध्ये बसून तिने हा विक्रम रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा हा व्हिडीओ शेअर केलाय. सोशल मीडियावर तिच्या या अनोख्या विश्वविक्रमाची प्रचंड चर्चा सुरूय.

ऑस्ट्रियाच्या साल्जबर्गमध्ये राहणारी स्टेफनी मिलिंगरने एल-सीट स्ट्रायडल प्रेस हॅंडस्टॅंडच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय. यासाठी तिने तब्बल ४०२ वेळा याप्रकारच्या व्यायामासाठी सराव केला होता. या फिटनेस चॅलेंजसाठी अपर बॉडी स्ट्रेंथ आणि लवचीक शरीर असणं फार गरजेचं असतं.

२९ वर्षीय स्टेफनी मिलिंगरने यापूर्वी सहा वेळा विश्वविक्रम रचलाय. यासाठी ती १० वर्षांपासून मेहनत घेतेय. तिच्या या अनोख्या पराक्रमामुळे सोशल मीडियावरील सेलिब्रिटी बनली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास ५,००,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. स्टेफनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फीचर्स पोस्ट शेअर करत अत्यंत संतुलीत आणि वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडीओ शेअर करत असते.

आणखी वाचा : Video : नवरीला पाहताच नवरदेव नाचत सुटला! भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल!

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने एक कॅप्शन देत तिच्या पराक्रमाचा व्हिडीओ शेअर केलाय. “एल-सीट पोजिशनमध्ये ५ मिनिटं १५ सेकंद इतक्या सर्वात जास्त वेळ बसून विक्रम रचणारी fanstefaniemillinger.” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. एल-सीट ही एका व्यायामात बसण्याची स्थिती आहे. यात संपूर्ण शरीराचे वजन हातांनी पेलायचं असतं आणि आपले पाय एल पोजिशनमध्ये ठेवायचे असतात. मिलिंगरने रचलेला हा अनोख विक्रम पाहून सोशल मीडियावर वरील युजर्स चकित झाले आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून कमेंट्स करत लोक तिचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १,१८४,४६४ व्ह्यूज आणि १,०४,३६४ लाइक्स मिळाले आहेत. तीन दिवसांपूर्वीच हा व्हिडीओज शेअर करण्यात आला असून अगदी वाऱ्यासारखा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.