scorecardresearch

सात वर्षाच्या मुलाने ‘या’ ट्रिक्स वापरून बनवली झटपट जिलेबी; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

७ वर्षाचा मुलगा स्वयंपाकघरातील प्रत्येक काम अतिशय उत्तम पद्धतीने करताना दिसत आहे.

7 year old boy makes jalebi
जिलेबी हा एक असा गोड पदार्थ आहे, जो पाहिला किंवा त्याची आठवण आली तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. (Photo : Instagram)

जिलेबी हा एक असा गोड पदार्थ आहे, जो पाहिला किंवा त्याची आठवण आली तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. शिवाय जिलेबी खाण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. हिवाळा असो की उन्हाळा, गरमागरम जिलेबी खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आजही सणासुदीला घरांमध्ये जिलेबी आवर्जून बनवली जाते. पण जिलेबी करणं तसं खूप अवगड काम आहे. पण सध्या केवळ सात वर्षाच्या मुलाने जिलेबी बनवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ज्यामध्ये तो जिलेबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि ती बनवायची पद्धत व्हिडीओत दाखवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगा आपलं भन्नाट कुकिंग टॅलेंट दाखवताना दिसत आहे. तो राजस्थानी पापडाच्या भाजीपासून ते चॉकलेट आणि केकपर्यंत तो अनेक पदार्थ स्वयंपाकघरात बनवताना दिसत आहे. सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या व्हिडिओमध्ये हा लहान मुलगा जिलेबी बनवत आहे. आपल्यापैकी काहीजण स्वयंपाकघरात जिलेबी बनवण्याच्या विचारानेच घाबरुन जातात. पण हा केवळ ७ वर्षाचा मुलगा स्वयंपाकघरातील प्रत्येक काम अतिशय उत्तम पद्धतीने करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- पोळ्या रात्रीपर्यंत मऊ-लुसलुशीत राहण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

हेही वाचा- अगदी कमी साहित्यात घरच्याघरी बनवा कॅरॅमल सॉस; जाणून घ्या ‘ही’ झटपट रेसिपी

व्हिडीओतील मुलगा जिलेबी बनवण्यासाठी प्रथम साखरेचा पाक आणि नंतर थोडेसे द्रावण तयार करतो. मग पिठ आणि जिलेबीसाठी लागणारे अनेक पदार्थ घेताना दिसत आहे. शिवाय जिलेबी बनवण्यासाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यायचा याची माहितीही तो मुलगा आपल्या हटके अंदाजात देत आहे. शेवटी तो जिलेबी तूपात टाकतो आणि तळतो. शिवाय व्हिडीओत हा मुलगा प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने करत असल्याचंही दिसून येत आहे. जिलेबी बनवल्यानंतर तो तिची चवही घेतो. या लहान मुलाच्या स्वयंपाक कोशल्य पाहून सोशल मीडियावर अनेक लोक प्रभावित झाले आहेत. अनेकजण त्याच्या या टॅलेंटत कौतुक करताना दिसत आहेत. अनेककांनी या व्हिडीओवर कमेंट करत “छान”, “वाह” आणि “अप्रतिम” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या