scorecardresearch

पोळ्या रात्रीपर्यंत मऊ-लुसलुशीत राहण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

उत्तम जेवण बनवणं ही एक कला आहे, जेवण बनवताना बऱ्याचदा काही चुका होतात ज्यामुळे जेवण फसतं

Smart Kitchen Tips
स्वयंपाकातील सर्वात अवघड वेळखाऊ आणि महत्वाचे काम म्हणजे पोळ्या बनवणे. (Photo : Freepik)

उत्तम जेवण बनवणं ही एक कला आहे, जेवण बनवताना बऱ्याचदा काही चुका होतात ज्यामुळे जेवण फसतं. मात्र, जेवण बनवताना काही योग्य टीप्स वापरल्या तर तुम्ही उत्तम स्वयंपाक सुद्धा बनवू शकता. खरतंर स्वयंपाकातील सर्वात अवघड वेळखाऊ आणि महत्वाचे काम म्हणजे पोळ्या बनवणे. भाजी, भात-आमटी, भजी असे इतर अनेक पदार्थ बनवणं तुलनेने सोपे असते.

पण पोळ्या करताना अनेक स्टेप्स असतात ज्यामुळे त्यासाठी वेळही जास्त जातो. पोळी आणि भाकरी हे आपले मुख्य अन्न आहे. त्यामुळे पोळ्यांना पर्यायही नसतो. त्यामुळे त्या योग्य पद्धतीने बनवायला शिकणं याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नसतो. त्यामुळे आपण बनवत असलेल्या पोळ्या मऊ-लुसलुशीत व्हाव्या यासाठी काय करावं लागेल याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया यांनी स्वयंपाकातील पोळ्या चांगल्या व्हाव्यात यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्या काय आहेत ते जाणून घेऊयात.

हेही पाहा- Video: १५ मिनिटात तयार करा पोह्याचा जाळीदार दावणगिरी डोसा; पीठ आंबवण्याची कटकटच नाही

सर्वात महत्वाच म्हणजे पोळ्या चांगल्या होण्यासाठी एकतर गहू चांगला असावा लागतो आणि पोळ्या बनवायचा सरावही असावा लागतो. शिवाय अनेकदा थंडीमुळे आणि पोळ्या बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्या कधी वातड तर कधी कडक होतात. शिवाय पोळ्या चांगल्या नसतील तर जेवणातली सगळी मजाच जाते. त्यामुळे पोळी बराच काळ मऊ-लुसलुशीत राहावी यासाठी पीठ मळण्यापासून ते ती भाजण्यापर्यंत सगळ्या स्टेप्स व्यवस्थित जमायला हव्यात. पंकज भदौरीया पोळ्या पुरीसारख्या फुगण्यासाठी काय टीप्स देतात ते पाहूया.

हेही पाहा- Video: भांडी घासताना डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत? वास व तेल दोन्ही हटवणारा ‘हा’ सोपा उपाय करा

  • पोळ्यांची कणीक भिजवताना साध्या पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे ज्यामुळे कणीक जास्त मऊ भिजते.
  • कणीक घट्ट न मळता मऊ मळावी. ज्यामुळे पोळ्या लुसलुशीत होतात. शिवाय कणीक थोडी जास्त वेळ मळावी.
  • कणीक मळल्यानंतर ती १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावी. त्यानंतरच पोळ्या कराव्यात. यामुळे कणकेतील ग्लुटेनची क्रिया होते आणि पोळ्या मऊ होण्यासाठी मदत होते.
  • १५ ते २० मिनीटांनी कणीक पुन्हा एकदा मळावी शिवाय पोळ्या एकसारख्या लाटाव्यात. याचा फायदाही पोळ्या मऊ-लुसलुशीत होण्यास होतो

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 20:23 IST
ताज्या बातम्या