Teen boy dies in new year party: आताच्या तरुण पिढीत दारु पिण्याचं व्यसन दिवसेंदिवस वाढत असल्याचं व्हायरल होणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून समोर येत आहे. पार्टीत दारु पिऊन मौजमजा करणं, ही आता सामान्य गोष्टच झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण पहिल्यांदाच दारु पिणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय. ही धक्कादायक घटना तामिळनाडूच्या यरकौड येथे घडली असून संतोष कुमार अंस मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. पार्टीत पहिल्यांदाच दारु पिल्यानंतर तरुणाला श्वसनाचा त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. दारु पिल्यावर संतोषचा अचानक मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या मित्रांनाही धक्का बसला. संतोषला नेमकं काय झालं? असा प्रश्न पार्टीत असणाऱ्या सर्वांना पडला आणि एकच खळबळ माजली.

नवीन वर्षाच्या पार्टीत संतोषने घेतला अखेरचा श्वास, कारण…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्यांदा दारु पिल्यानंतर संतोषचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या यरकौड येथे घडली. या परिसरात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला झालेल्या पार्टीत संतोष पहिल्यांदाच दारु प्यायला. त्यानंतर अचानक त्याचा मृत्यू झाला. संतोषचा मृत्यू झाल्याचे कळताच पार्टीत असणाऱ्या माणसांना आश्चर्याचा धक्का बसला.

नक्की वाचा – Video: बघता बघता विशाल अजगराने लहान मुलाला विळखाच घातला, पुढं जे घडलं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोषला दारुचं व्यसन नव्हत, पण…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सलेमच्या मल्लूर वेंगमपट्टी शहरात संतोष राहायचा. संतोष त्याच्या मित्रांसोबत याच परिसरातील एका रिसॉर्टमध्ये पार्टी करायला गेला होता. संतोषला दारु पिण्याचं व्यसनं नव्हतं. पण त्याचे मित्रसोबत असल्याने तो पार्टीत दारु प्यायला. दारु पिल्यानंतर संतोष त्याच्या मित्रांसोबत बसला होता. त्याचदरम्यान संतोषला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाला. संतोषची प्रकृती खालावल्याचं कळताच त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण संतोषचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषीत केलं. संतोष त्याच्या वडीलांसोबत दुकानात काम करायचा.