Viral Video : कुत्रा हा माणसाच्या अत्यंत जवळचा प्राणी मानला जातो. कुत्रा हा माणसाचा खास मित्र असतो जो प्रत्येक सुख दु:खात त्याच्याजवळ असतो. कुत्र्यानी माणसाचा जीव वाचवला, असे अनेकदा तुम्ही वाचले असेल किंवा पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण या व्हिडीओमध्ये या तरुणीने कुत्र्याचा जीव वाचवला आहे. एका पेटत्या इमारतीत फसलेल्या कुत्र्याचा एका तरुणीने जीव वाचवला. स्वत:चा जीव धोक्यात टाकून कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या या तरुणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Good News Movement या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल जी फोनवर बोलताना दिसतेय. ती फोनवर पेटत्या इमारतीत फसलेल्या कुत्र्याविषयी सांगते.त्यानंतर पुढे व्हिडीओत एका बंद खोलीत एक कुत्रा पिंजऱ्यात बंद दिसतो त्यानंतर एक महिला तिथे येते आणि त्या कुत्र्याला सोडवते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या कुत्र्याला पिंजऱ्यात बंद केले होते त्यामुळे कुत्रा सुद्धा स्वत:हून पळू शकत नव्हता.

हेही वाचा : चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO

या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या घटनेविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार एक तरुणी शेजारच्या कुत्र्याला वाचवण्यासाठी एका पेटत्या इमारतीत जाते आणि त्या इमारतीत फसलेल्या कुत्र्याचा जीव वाचवते.ही तरुणी स्वत:चा जीव धोक्यात घालून तिच्या बहिणीच्या कुत्र्याचा म्हणजे बुब्बाचा जीव वाचविते.

हा व्हिडीओ लाखो युजर्सनी लाइक केला असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “खरंच ही तरूण देवदूत आहे” तर एका युजरने लिहिले, “धाडसी मुलीने कुत्र्याचा जीव वाचवला” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच खूप छान काम केले. देवाची कृपा तुझ्यावर असू दे” अनेक युजर्सनी या तरुणीचे कौतुक केले आहे. काही युजर्सनी कुत्र्याचा जीव वाचवल्याबद्गल तरुणीचे आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.