पुन्हा स्वस्त खरेदीसाठी सज्ज व्हा! कारण अ‍ॅमेझॉनचा सर्वात मोठा सेल आता काहीच दिवसांवर आला आहे. अ‍ॅमेझॉनचा ‘द ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल २०२१ हा ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल. या फेस्टिवल सेलमध्ये अ‍ॅमेझॉन लाँचपॅड, अ‍ॅमेझॉन सहेली, अ‍ॅमेझॉन कारागीर अंतर्गत अ‍ॅमेझॉन विक्रेत्यांच्या उत्पदनांसह अनेक श्रेण्यांमधील टॉप भारतीय आणि जागतिक ब्रँड्स देखील असतील. या सेलअंतर्गत लाखो लघु मध्यम (एसएमबी) उद्योजक आपल्या मालाची विक्री करू शकतील. यावेळी या सेलमध्ये सुमारे ४५० शहरांमधील ७५ हजारांहून अधिक स्थानिक दुकानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये १ हजारहून अधिक नव्या उत्पादनांचा समावेश होणार आहे.

Amazon ने काय म्हटलं?

अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी म्हणाले की, “या वर्षीचा ग्रेट इंडियन फेस्टिवल हा स्थानिक दुकानं आणि लहान-मध्यम विक्रेत्यांच्या कामाचा आणि जिद्दीचा उत्सव आहे. आम्ही त्यांच्या जिद्दीने भारावून गेलो आहोत. त्यांच्यासोबत भागीदारी करण्याच्या आणि त्यांना आणखी वाढण्यास मदत करण्याच्या हेतूने या संधीचा आम्ही देखील आनंद घेत आहोत. विशेषत: सध्याच्या करोना काळात हेच मोठं आव्हान आहे. आम्ही आमच्या ग्राहकांची व्यापक निवड, किंमत आणि सुविधा आनंदाचा पेटाऱ्यातून जलद गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहोत. जेणेकरून ते त्यांच्या घरात अगदी आरामात आणि सुरक्षिततेसह सण-वारांसाठी तयारी सुरु करू शकतील.

ऑफर्स जाणून घ्या


१. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर तुम्हाला ७५० रुपयांचा जॉइनिंग बोनस आणि ५% रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील.
२. अ‍ॅमेझॉन पे वर साइन अप केल्यानंतर ६० हजारांच्या झटपट क्रेडिटसह तुम्हाला फ्लॅट १५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय १००० रुपयांचे गिफ्ट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना १००० रुपयांची रिवोर्ड्स परत मिळतील. त्याचवेळी, अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये पैसे जोडल्यास ग्राहकांना २०० रुपयांचं बक्षीस आणि अ‍ॅमेझॉन पे यूपीआय वापरून केलेल्या खरेदीवर १०० रुपयांपर्यंत १०% कॅशबॅक मिळेल.
३. कॉर्पोरेट भेटवस्तूंवर खास ऑफर्स, बल्क डिस्काउंट, परवडणाऱ्या किमतीत फेस्टिव्हल ऑफर, कॅशबॅक, बक्षिसं इ. मिळेल.
४. ग्राहकांना एचपी, लेनोवो, कॅनन, गोदरेज, कॅसिओ, युरेका फोर्ब्स इत्यादी टॉप ब्रॅण्डमधून लॅपटॉप, प्रिंटर, नेटवर्किंग डिव्हाइसेस, ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स, व्हॅक्यूम क्लीनर इत्यादी श्रेणींमध्ये जीएसटी इनव्हॉइससह २८% अधिक बचत होईल.

१ लाख १० हजार ००० पेक्षा जास्त लोकांना मिळेल रोजगार

सणासुदीच्या काळात ग्राहकांपर्यंत सुरक्षित, जलद गतीने आणि विश्वासार्ह पद्धतीने वस्तू पोहोचत्या करण्यासाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची घोषणा अ‍ॅमेझॉनने केली आहे. कंपनीने आपली स्टोरेज क्षमता ४०%ने वाढवून आपलं नेटवर्क वाढवलं ​​आहे. देशातील दुर्गम भागांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने सुमारे १ हजार ७०० अ‍ॅमेझॉनच्या मालकीची आणि पार्टनर्सची डिलिव्हरी स्टेशन्स उभारली आहेत. तसेच, कंपनीचे सुमारे २८ हजार ‘आय हॅव स्पेस’ पार्टनर आणि हजारो अ‍ॅमेझॉन फ्लेक्स डिलिव्हरी पार्टनर्स आहेत.