न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स काही काळापासून हृदयरोगाशी झुंज देत होता. गेल्या महिन्यात झालेल्या हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला स्पायनल स्ट्रोक आला होता आणि त्याला लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून त्याच्यावर ऑस्ट्रेलियात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान, बरं होतानाचं हे माझ्यासमोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे, असे ख्रिस केर्न्स याने रविवारी सांगितले.

५१ वर्षीय माजी क्रिकेटपटूला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याच्या हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली होती. या अशा समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये अॅरोटीक डायसेक्शन असे म्हणतात.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

“सहा आठवड्यांपूर्वी मला टाईप ए अॅरोटीक डायसेक्शन सामना करावा लागला. ज्याचा अर्थ असा आहे की माझ्या हृदयाच्या एका धमणीमध्ये छिद्र आहे आणि ही खूप दुर्मिळ आणि गंभीर परिस्थिती आहे. हे ६ आठवडे माझ्यासाठी खूप मोठे होते. अॅरोटीक डायसेक्शन साठी इमरजेन्सी शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्यानंतर अनेक गुंतागुंत झाली आणि मला स्पायनल स्ट्रोकचा त्रास झाला. अजून पुढे खूप मोठी वाट आहे. पण सध्या तरी मी इथं आहे, यासाठी आभारी आहे,” असं केर्न्सने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलंय.

ख्रिसची कारकीर्द..

ख्रिसने न्यूझीलंडकडून ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच तो देशासाठी दोन टी-२० सामनेही खेळला आहे. १९८९ ते २००६ दरम्यान त्याने न्यूझीलंडकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून समाधानकारक कामगिरी केली. नंतर तो समाचोलक म्हणून काम करायचा. आपल्या कालावधीमध्ये ख्रिस हा सर्वोच्च अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. विशेष म्हणजे त्याचे वडील लान्स हे सुद्धा न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले आहेत.

मॅच फिक्सिंगचा आरोप..

२००८ साली भारतात खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंढीगड लायन्स संघाकडून खेळताना मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले. त्याने यासंदर्भात कायदेशीर लढाईही लढली आहे.