scorecardresearch

१० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, इचलकरंजीतील नगरसेविकेची पतीविरोधात तक्रार

इचलकरंजीतील नगरसेविकेचे प्रेमविवाह झाले होते. संबंधित नगरसेविकेचा पतीही राजकारणात सक्रीय आहे.

संग्रहित छायाचित्र

इचलकरंजीतील एका नगरसेविकेने पतीविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. पतीने स्वत:च्याच १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

इचलकरंजीतील नगरसेविकेचे प्रेमविवाह झाले होते. संबंधित नगरसेविकेचा पतीही राजकारणात सक्रीय आहे. शुक्रवारी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पतीने स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून पतीने मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोपही महिलेने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महिलेला दोन मुलं आहेत. मुलगी दहा वर्षांची तर मुलगा ७ वर्षांचा आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी मुलीने मला बाबा अत्याचार करत असल्याचे सांगितले होते. मी पतीला याबाबत जाबही विचारला होता. मात्र, त्यांनी मला धमकावले. यानंतरही पतीने माझ्यावर आणि मुलीवरही अत्याचार सुरूच ठेवले आहे. नराधम पती स्वत:च्या मुलीला क्राईम शोमधील बलात्काराचे दृश्य आणि यूट्यूबवरील अश्लील व्हिडिओ दाखवायचा, असा आरोपही महिलेने केला आहे. शुक्रवारी रात्रीही पतीने माझ्यासमोरच मुलीवर अत्याचार केल्याचे महिलेने म्हटले आहे.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ichalkaranji corporator filed case against husband alleges rape on daughter

ताज्या बातम्या