मुंबईच्या २१२ रन्सच्या डोंगरापुढे दिल्लीचे बॅट्समन हतबल ठरले. गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांना १४६ रन्सनी मात दिली. डेअरडेव्हिल्सची पहिल्याच बाॅलला विकेट गेल्याने त्यांच्यावरचं दडपण वाढलं आहे. त्यांची दुसरी विकेटही लगेचच गेली आहे

मुंबई  इंडियन्स सध्या आयपीएलवर राज्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत ११ मॅचपैकी ९ जिंकून गुणतालिकेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांना ४ दिवसांची विश्रांती मिळालेली असल्याने त्यांचा या मॅचमधला परफाॅर्मन्स चांगला ठरणार असण्याची शक्यता होती. आणि तसंच झालं मुंबईने २० ओव्हर्समध्ये तीन विकेट्सच्या मोबदल्यात २१२ रन्सचा डोंगर उभारला आहे. मुंबईच्या बॅटिंगची सुरूवातच जबरदस्त झाली बिनबाद धावसंख्या सत्तरीमध्ये पोचल्यावर मुंबईची पहिली विकेट गेली. आणि त्यानंतर आणखी दोन विकेट्स गेल्या पण मॅचची सुरूवातच चांगली झालेली असल्याने कायरन पाॅलार्ड आणि पंड्याच्या बॅटिंगपुढे दिल्लीचे बाॅलर्स फारच दयनीय वाटत होते. मुंबई इंडियन्स़नी आता  प्लेआॅफमध्ये जागा पटकावली आहे.

LSG beat MI by 4 Wickets
IPL 2024: लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठीचं गणित अवघड
KKR Equals Mumbai Indians Record of Winning Most Matches on One Venue
IPL 2024: केकेआरने ईडन गार्डन्सवर नोंदवला ऐतिहासिक विजय, मुंबई इंडियन्सच्या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी
IPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सने रचले विक्रमांचे इमले
Mumbai Indians vs Delhi Capitals match highlights in marathi
MI vs DC : मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते, दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी उडवला धुव्वा

दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीमही चांगलीच तयारीत असल्याचं म्हटलं जात होतं. मुंबई इंडियन्सना भिडण्याआधीच्या दोन मॅचमध्ये हैदराबाद आणि गुजरातला हरवल्याने त्यांचं मनोधैर्य नक्कीच उंचावलेलं होतं असं म्हटलं जात होतं. पण या मॅचमध्ये ते बिलकूल दिसलं नाही. आधी मुंबईच्या बॅटिंगसमोर त्यांचे बाॅलर्स फिके पडले. नंतर त्यांची बॅटिंगही पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. दिल्लीच्या इनिंगच्या पहिल्याच बाॅलला संजू सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने दिल्लीपुढचं चित्र आणखी स्पष्ट झालं.यानंतर त्यांचे बॅट्समन टप्प्याटप्प्याने आऊट होत गेले. आणि १४ व्या ओव्हरमध्ये त्यांनी नांगी टाकली. दिल्लीचा संघ अवघ्या ६६ रन्समध्ये आॅलआऊट झाला