tubelight negative review : ‘ट्युबलाइट’च्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे सलमान रागावला

लोक मला रडताना बघून हसत आहेत का?

सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ट्युबलाइट' चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला.

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ट्युबलाइट’ चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट त्याचे चाहते वगळता कोणालाही फारसा आवडलेला दिसत नाही. चित्रपट समीक्षकांनीही सलमानच्या या चित्रपटाला नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटासाठी देण्यात आलेल्या निगेटीव्ह रिव्ह्यूमुळे सलमान नाराज आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सलमानने एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी चित्रपटाला मिळालेल्या निगेटीव्ह रिव्ह्यूवर सलमानने त्याच्या अंदाजात नाराजी व्यक्त केली.

सलमानने यावेळी चिडचिड न करता त्याचा राग व्यक्त केला. चित्रपट समीक्षकांना टोमणा मारत त्याने म्हटले की, ट्युबलाइटला तर ‘मायनस’मध्ये स्टार दिले जातील असं आम्हाला वाटलं होतं. पण आम्हाला तर दीड स्टार मिळाला आहे. समीक्षकांना टोमणा मारल्यानंतर सलमानने प्रेक्षकांवरही निशाणा साधला. हा चित्रपट रोड रोमिओंसाठी नाहीये. संपूर्ण कुटुंबासोबत बसून चित्रपट बघणाऱ्यांसाठी ट्युबलाइट आहे. चित्रपट बघताना नाच-गाणी करत गोंधळ घालणाऱ्यांसाठी नाहीये.

वाचा : आराध्यासोबत असं एन्जॉय करतायेत ऐश्वर्या आणि अभिषेक

सलमान म्हणाला की, माझ्या चित्रपटाला समीक्षकांनी दिलेले रिव्ह्यू खूप चांगले आहेत. -३ किंवा -४ असे स्टार मिळतील अशी मला अपेक्षा होती. पण मला तर दीड स्टार मिळाले असल्याने मी संतुष्ट आहे. लोक भाईला (सलमान) पडद्यावर रडताना बघू शकत नाही अशा बातम्या येत आहेत. याबद्दल मी माझ्या माणसांना विचारलं की, लोक मला रडताना बघून हसत आहेत का? त्यावर उलट मला रडताना बघून तेसुद्धा रडत असल्याचं माझ्या माणसांनी सांगितले. यावर मग उलट चिंतेची काहीच बाब नाही, असं मी म्हणालो. सलमानच्या मते हा एक भावनिक चित्रपट असून चित्रपट बघणारा कितीही कठोर मनाचा असला तरी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील. तसेच, हा चित्रपट तुम्ही तुमच्या आई-वडील, बहिण-भाऊ आणि संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन बघा असेही त्याने म्हटले.

वाचा : सुव्रत-मृण्मयीच्या ‘लग्ना’चा फोटो पाहिलात का?

‘ट्युबलाइट’ २३ जूनला प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाने २१.१५ कोटी रुपयांची कमाई केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khans reaction on tubelight negative review

ताज्या बातम्या