बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वेगवगेळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेक व्हिडीओ पोस्ट करत असते. शिल्पा गेल्या काही दिवसांपासून तिच्या दोन्ही मुलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी शिल्पाने इंटरनॅशनल डॉटर्स डे चे औचित्य साधत मुलीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. आता तिने अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये ती आणि समिषाने एकाच पद्धतीचा ड्रेस परिधान केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमधील एका फोटोत शिल्पा समिषाशी खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती समिषाला काही तरी दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओला छानसं गाणं लाऊन कॅप्शन दिलं,” फरक ओळखा पाहू”.

शिल्पा आणि समिषा हे फोटो पाहून खरंच फरक ओळखता येत नाही आहे. नेटकरी दोघांच्या या लूकवर फिदा झाले आहेत, हार्ट आकाराचे चिन्ह देतं त्याच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी समिषाचे स्वागत केले, त्यांना वियान नावाचा नऊ वर्षांचा मुलगा आहे.