इतिहास- बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. भारताची सत्ता जेव्हा इस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८चा अर्थसंकल्प मांडला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.
व्याख्या- वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आíथक परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प.
भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षकि वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द वापरण्यात आला आहे. घटनेच्या ११२व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर २०२व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो.
कोणत्याही वर्षांच्या अर्थसंकल्पात सरकारी जमाखर्चाचे तीन वर्षांचे आकडे दिलेले असतात. ज्यात
१) गेल्या वित्तीय वर्षांचे प्रत्यक्ष आकडे (Actuals)
२) चालू वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates) व संशोधित अंदाज (Revised Estimates)
३) तसेच पुढील वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates)
अर्थसंकल्प हा वित्त मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या आíथक कामकाज विभागामार्फत (Department of Economic Affairs) तयार केला जातो, मात्र घटनेच्या 112व्या कलमानुसार प्रत्येक आíथक वर्षांसाठी तयार केलेले बजेट संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचे घडवून आणण्याचे कार्य (Cause to be laid)राष्ट्रपतींचे आहे व राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ते कार्य कलम २०२ नुसार राज्याच्या राज्यपालांचे आहे. भारतात दरवर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेचे बजेट अधिवेशन सुरू होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी २८ फेब्रुवारी / २९ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो. साधारणत: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी चालू वर्षांची भारताची आर्थिक पाहणी (Economic survey) अहवाल संसदेत मांडला जातो.
१९२१च्या अ‍ॅकवर्थ समितीच्या शिफारशीनुसार १९२४ पासून रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जातो. साधारणत: २५/२६ फेब्रुवारीला रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जातो. मार्चचा महिना दोन्ही अर्थसंकल्पांना कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी राखीव ठेवला जातो. मात्र कधीकधी मान्यता मिळविण्यासाठी मे महिना उजाडतो. हा अर्थसंकल्प १ एप्रिल ते ३१ मार्च या वित्तीय वर्षांसाठी असतो.
अर्थसंकल्पाचे प्रकार (Types  Budget)
१) समतोल अर्थसंकल्प (Balanced Budget)-  जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात. २) शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget)- जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकी अर्थसंकल्प म्हणतात. ३) तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget)- जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.
अर्थसंकल्पांचे स्वरूप (structure of Budget)
१) पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget)- पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.
२) निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget)- निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.
३) शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget)- शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.
पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला. त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)
४) फलनिष्पत्ती अर्थसंकल्प (Outcome Budget)- भारताच्या इतिहासात सर्वप्रथम पी. चिदंबरम यांनी २५ ऑगस्ट २९९५ रोजी सन २००५-२००६ या वर्षांसाठी सादर केला. गुंतवणूक खर्चापासून होणारे परिणाम, जेव्हा त्या परिणामांना आधार बनवून बजेट तयार केले जाते तेव्हा त्याला निष्पादन बजेट म्हणतात म्हणजे या अर्थसंकल्पात सामान्य अर्थसंकल्पाद्वारे प्रत्येक मंत्रालय/विभाग/ संस्थांना वाटावयाच्या योजनानिहाय/ प्रकल्पनिहाय वित्तीय साधनांबरोबर (Outlays) त्यांनी साध्य करावयाच्या फलनिष्पत्तींचा किंवा परिणामांचा (Outcome) समावेश असतो. या परिणामांचे मोजमाप करण्यासाठी मोजता येऊ शकतील असे भौतिक लक्ष्य निश्चित करण्यात आलेले असते.

यूपीएससी : भूकंप लहरी
भूकंप लहरी- ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच भूकंप लहरी असे म्हणतात.
नाभी (Focus)- भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.
अधिकेंद्र (Epicentre)- नाभीच्या अगदी वर क्षितीजवळाच्या लंबरेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो बिंदू मिळतो, त्याला अधिकेंद्र असे म्हणतात. भूकंप केंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव अधिकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते तसतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.
भूकंप अधिलेख (Seismogram)- भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंप लहरीचे तीन प्रकार पडतात.
१) प्राथमिक लहरी २) दुय्यम लहरी ३) भूपृष्ठ लहरी
१) प्राथमिक लहरी (P waves)- प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो. प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात. प्राथमिक लहरी या ध्वनिलहरींप्रमाणे असतात. यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.
२) दुय्यम लहरी (S waves)- दुय्यम लहरी या प्रकाशलहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरन दिशेशी समलंब दिशेने घडून येते. दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात, परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत. सर्वसाधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.
३) भूपृष्ठ लहरी ((L waves)-  भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. भूपृष्ठ लहरी पृथ्वींपासून आरपार न जाता पृथ्वी गोलाला फेरी मारतात. भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
रिश्टर स्केल (Richter Scale)- अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ चार्ल्स रेक्टर यांनी १९३५साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रेक्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साहाय्याने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा १ ते ९ या दरम्यान असतात.
भूकंपाचे जागतिक वितरण-
१) पॅसिफिक महासागराचा पट्टा- जगातील ६५टक्के भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात. यात इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो. भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत अलास्कापासून रॉकीज पर्वत, दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटार्टकिा खंडापर्यंत गेलेला आहे. या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विध्वंसक भूकंप येतात.
२) मध्य अटलांटिक पट्टा- या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिंझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो. येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.
३) भूमध्य सागरीय पट्टा- या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे. ज्वालामुखी- भूगर्भातील शिलारस, बाष्प, विविध वायू व घटकद्रव्य यांचा भूपृष्ठांवर जो उद्रेक होतो त्याला ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीचे वर्गीकरण- ज्वालामुखीचे वर्गीकरण हे वेगवेगळय़ा प्रकारे केले जाते.
अ) ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या विशिष्ट केंद्रानुसार पुढील प्रकार पडतात.
१) हवाईयन ज्वालामुखी- या प्रकारच्या ज्वालामुखीचे उद्रेक फारसे स्फोटक नसतात. शिलारस हा पातळ असतो. घन किंवा वायुरूप पदार्थ पातळ असतात. हवाई बेटांवर अशाप्रकारचा ज्वालामुखी असल्याने यास हवाईयन असे नाव देण्यात आले आहे. २) स्ट्रॉम्बोलियन ज्वालामुखी- या ज्वालामुखीतून अल्कधर्मी प्रकारचा शिलारस बाहेर पडतो. यात वायूंचे प्रमाण जास्त असल्याने उद्रेक स्फोटक असतात. भूमध्य सागरातील सिसिली बेटांजवळ स्ट्रॉम्बोली प्रकारचा ज्वालामुखी आहे. ३) व्हलकॅनियन ज्वालामुखी- या प्रकारच्या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा शिलारस जास्त घट्ट असतो. ज्वालामुखीचे उद्रेक बंद झाल्यावर नलिकेतून शिलारस थंड होतो व नलिका मुख बंद होते. पुन्हा उद्रेक झाल्यावर मुखाच्या माथ्याचा खडक वर उडतो. या प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक अतिशय स्फोटक असतात. स्ट्रॉम्बोलीजवळील लिपारी बेटावर व्हलकॅनियन ज्वालामुखी याचे उदाहरण आहे. ४) पिलीअन ज्वालामुखी- या प्रकारचे ज्वालामुखी अतिशय स्फोटक असतात. धूळ, खडकांचे तुकडे ज्वालामुखीच्या स्फोटाच्या वेळी जास्त प्रमाणात बोहर पडतात. पिली येथे अशाप्रकारचा ज्वालामुखी तयार झाला आहे.
उद्रेकाच्या कालखंडानुसार त्याचे खालील तीन प्रकार पडतात-
अ)    जागृत ज्वालामुखी- ज्वालामुखीमधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो तसेच त्यांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. त्यांना जागृत ज्वालामुखी असे म्हणातात. इ) निद्रिस्त ज्वालामुखी- ज्या ज्वालामुखीमधून एके काळी जागृत ज्वालामुखीप्रमाणे सतत उद्रेक होत असत, परंतु सध्या उद्रेक होणे थांबलेले आहे आणि पुन्हा अचानकपणे उद्रेक होण्याची शक्यता आहे अशा ज्वालामुखीस निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. उ)     मृत ज्वालामुखी- ज्या ज्वालामुखीमध्ये पूर्वी एकेकाळी उद्रेक होत असत. आता उद्रेक होत नाहीत, त्यास मृत ज्वालामुखी असे म्हणतात. उदा., जपानमधील फुजियामा पर्वत.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?