=    भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात एकूण गुण मिळालेल्या १०० विद्यार्थ्यांची माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे. ती वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
upsc01
५)    रसायनशास्त्रात कट ऑफ  गुण ३० असलेले विद्यार्थी आणि त्याच विषयात कट ऑफ  गुण ३० असलेले सरासरी  (Average-Aggregate) विद्यार्थी यांत किती फरक  आहे?
    १) २    २) ४    ३) ५    ४) ६
स्पष्टीकरण : ३० कट ऑफ गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणजे ३० हून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. दिलेल्या माहितीनुसार असे २१ विद्यार्थी आहेत, तसेच ३० कट ऑफ असलेले सरासरी विद्यार्थी २७ आहेत. म्हणून त्यामधील फरक  = २७ – २१ = ६
६) जर भौतिकशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी किमान ६० टक्के गुणांची गरज असेल तर भौतिकशास्त्र या विषयात उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल?
    १) २७    २) ३२
    ३) ३४    ४) ४१
स्पष्टीकरण :  विविध विषयांत ५० पकी मिळालेले गुण दर्शवलेले आहेत, म्हणून सर्वप्रथम ५० गुणांचे ६० टक्के काढून घ्यावेत. म्हणून
        
    ५० चे ६०%  म्हणजे =६०/१०० x ५०    = ३०
        
    म्हणजे भौतिकशास्त्रात ५० गुणांपकी ३० गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. दिलेल्या माहितीवरून ३० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या = ३२
७) रसायनशास्त्रात कमीत कमी ६० टक्के मार्क मिळविणारे विद्यार्थी हे किमान अ‍ॅॅग्रीगेट ४० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहेत ?
    १) २१%    २) २७%
    ३) २९%    ४) ३१%
स्पष्टीकरण :
१)    रसायनशास्त्रात किमान ६० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी म्हणजे ३० पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी २१ आहेत.
२)    अ‍ॅॅग्रिगेट किमान ४० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी म्हणजे
२० पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी. दिलेल्या माहितीवरून ही संख्या ७३ आहे.
        
टक्केवारी =    २१/७३ x १००    = २८.७७% ल् २९%
        
८) अ‍ॅॅग्रिगेट ४० टक्क्य़ांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या-
    १) १३    २) १९
    ३) २०    ४) २७
स्पष्टीकरण :
१)    आपल्याला ५० पकी गुण दिलेले आहेत, म्हणून ४० टक्के म्हणजे..
   अ‍ॅग्रीगेट २० पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्यांची संख्या = १०० – अ‍ॅग्रीगेट २० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांची संख्या
    = १०० – ७३  = २७
९)    जर रसायनशास्त्र या विषयात उच्च पदवी घेण्यासाठी किमान २३ विद्यार्थ्यांना परवानगी मिळाली, तर रसायनशास्त्र या विषयात उच्च पदवी घेण्यासाठी किमान किती गुणांची
गरज आहे ?
    १) ४०-४५        २) ३०-४०
    ३) २०-३०        ४) २० पेक्षा कमी
स्पष्टीकरण :  दिलेल्या माहितीवरून ६६ विद्यार्थ्यांना २० पेक्षा जास्त गुण रसायनशास्त्रात मिळालेले आहेत, त्यापकी २१ विद्यार्थ्यांना ३० पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, म्हणून टॉप ३५ विद्यार्थ्यांना निवडायचे असल्यास गुण २०-३०
    या मधील असतील.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com