या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत असतात, त्यांचाही संदर्भ जाणून घ्यावा. भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घेणे अत्यावश्यक आहे. महत्त्वाची कलमे लिहून ती पुन:पुन्हा वाचावीत. भारतीय राज्यघटनेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहुयात-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

= खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
अ) राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ३० वष्रे असावे.
ब) घटनेच्या कलम ७५ नुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरीत्या लोकसभेला जबाबदार असते, म्हणजेच लोकसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो, अविश्वास ठराव मांडल्याच्या स्वीकृतीसाठी किमान ५० सदस्यांचे समर्थन आवश्यक असते.
१) फक्त अ विधान २) फक्तब विधान
३) अ व ब दोन्हीही ४) अ व ब दोन्हीही नाही.
स्पष्टीकरण : राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २५ वष्रे असावे लागते.
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) घटनेच्या कलम १५० नुसार भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सहीशिक्यानिशी अधिपत्राद्वारे करतात.
ब) घटनेच्या कलम २२३ अन्वये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्तअसेल किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तात्पुरत्या कारणामुळे अनुपस्थितीत असतील किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपल्या पदांच्या कर्तव्यांचे पालन करण्यास असमर्थ असतील तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपकी एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक हंगामी न्यायाधीश म्हणून करू शकतात.
१) फक्त अ विधान २) फक्त ब विधान
३) अ व ब दोन्हीही ४) अ व ब दोन्हीही नाही.
स्पष्टीकरण : घटनेच्या कलम १४८ नुसार, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सहीशिक्यानिशी अधिपत्राद्वारे करतात.
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) भारतीय घटनेत संघराज्याचे तसेच एकात्मक राज्याचे अशी दोन्ही वैशिष्टय़े अवतरलेली आहेत.
२) मूलभूत हक्क संरक्षणाची हमी देणारे आणि मूलभूत हक्कांवर गदा आली असता न्यायालयासमोर दाद मागण्याचा हक्क देणारे भारतीय घटनेतील ३२ वे कलम म्हणजे मूलभूत हक्कांचा आत्मा होय.
३) न्यायालयीन पुनर्विलोकनाची कल्पना आपण अमेरिकी घटनेवरून घेतलेली आहे.
४) पंतप्रधान हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
१) १ व २ २) २ व ४ ३) ३ व १ ४) वरीलपकी सर्व
= खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
१) राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडीसंदर्भात वाद निर्माण झाल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा आहे, हे भारतीय राज्यघटनेच्या
७१ व्या कलमात नमूद केलेले आहे.
२) केंद्र सरकारच्या कारभाराविषयी माहिती व केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय पंतप्रधान राष्ट्रपतींना कळवतात. राष्ट्रपतींच्या संदर्भातील पंतप्रधानांचे हे कर्तव्य घटनेच्या ७८ व्या कलमात नमूद केलेले आहे.
३) लोकसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
४) पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असतो.
= खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे, तहकूब करणे, रद्द करणे इ. अधिकार घटनेतील कलम ७२ व्या कलमान्वये राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.
२) राष्ट्रपतींना त्यांचे लष्करी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतात.
३) राष्ट्रपती संसदेच्या सहमतीशिवाय युद्ध पुकारू शकत नाही.
४) ४४ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठेवण्यात आला आहे.
१) १ व २ २) २ व ४ ३) ३ व १ ४) १, २ व ३ बरोबर
स्पष्टीकरण : ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठेवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc
First published on: 10-03-2015 at 04:01 IST