तापमानाची विपरीतता पुढील गोष्टींमुळे होते..
* निरभ्र आकाश : यामुळे उष्णतेचे उत्सर्जन अडथळ्याशिवाय वेगाने होते. उष्णेतेचे उत्सर्जन झाल्यामुळे जमीन थंड होते. त्यामुळे जमिनीलगतचा हवेचा थर थंड होतो व त्या तुलनेमुळे हवेचे वरचे वातावरण उबदार राहते. त्यामुळे जसजशी उंची वाढली तसतसे तापमान कमी न होता वाढलेले आढळते.
* पर्वतमय प्रदेश : जर डोंगराळ भाग असेल तर थंड हवा तिच्या वजनामुळे खाली सरकते व उष्ण हवा वर येते.
* रात्रीचा कालावधी मोठा असेल तर- उदा. हिवाळ्यामध्ये जमिनीतून होणारे उष्णतेचे उत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते, म्हणून जमिनीलगतचा थर थंड हवेचा असतो तर त्याच्या वरचा थर उष्ण हवेचा असतो.
* हिमाच्छादित भूपृष्ठ भाग : जमिनीवरील भूपृष्ठभाग हिमाच्छादित असेल तर या पृष्ठभागावरून सूर्यकिरणांचे परावर्तन जास्त होते, त्यामुळे जमिनीजवळचा पृष्ठभाग थंड राहतो तर वरचा पृष्ठभाग उष्ण राहतो.
तापमान कक्ष : पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणच्या तापमानाचा अभ्यास करताना खालील तापमान कक्षांचा विचार केला जातो- दैनिक तापमान कक्षा आणि वार्षकि तापमान कक्षा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* दैनिक तापमान कक्षा : २४ तासांपकी कमाल तापमान व किमान तापमान यांतील फरकाला ‘दैनिक तापमान कक्षा’ असे म्हणतात. या कक्षेची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-
* वाळंवटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
* सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत भागात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
* विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास दैनिक तापमान कक्षा वाढत जाते.
* सर्वसाधारण जमिनीपेक्षा हिमाच्छादित भागात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
* ओलावा असणाऱ्या जमिनीवर दैनिक तापमान कक्षा कमी असते.

मराठीतील सर्व स्पर्धा परीक्षा गुरू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorology upsc examination
First published on: 03-04-2016 at 04:17 IST