युरोप खंडातील महत्त्वाचे देश :

स्कॅन्डिनेव्हियन देश : युरोपातील आईसलँड, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क यांना ‘स्कॅन्डिनेव्हियन देश’ म्हणतात.

grape, grape export, America, Europe,
अमेरिका, युरोपला उच्चांकी द्राक्ष निर्यात
us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
loksatta analysis causes of rising inflation
विश्लेषण : महागाईविरोधी युद्धात ‘नव्या शत्रूं’चा समावेश?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
  • फिनलँड : फिनलँड हा (रशिया वगळता) युरोपातील पाचव्या क्रमाकांचा देश आहे. इमारती लाकूड आणि कागदाच्या उत्पादनात फिनलँड आघाडीचा उत्पादक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणावर वनोद्योगावर आधारित आहे. लाकडावर प्रक्रिया करणे, लाकडाचा लगदा बनवणे आणि कागद बनवणे हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. सरोवरांचा आणि बेटांचा देश असे फिनलँडचे वर्णन केले जाते. हेलसिंकी ही फिनलँडची राजधानी आहे.
  • आईसलँड : ग्रेट ब्रिटननंतर आईसलँड हे युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. उत्तर अटलांटिक महासागरात आíक्टक वर्तुळाच्या दक्षिणेला असलेले हे बेट नॉर्वेच्या पश्चिमेला आहे. राजधानी रेकयाविक ही राजधानी जगातील सर्वात उत्तरेकडील असलेली राजधानी आहे.
  • नॉर्वे : या देशाचा उल्लेख ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा देश’ असा केला जातो. उत्तर समुद्रामुळे ब्रिटन आणि नॉर्वे एकमेकांपासून अलग झालेले आहेत. या देशात कोळसा व खनिज तेल फारच कमी प्रमाणात सापडत असल्याने या देशाने जलविद्युतशक्तीचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे. राजधानी ओस्लो हे नॉर्वेतील महत्त्वाचे बेट आहे. नॉर्वेच्या उत्तरेला लोफोटन द्विपसमूह असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कॉड माशांची शिकार होते.
  •  स्वीडन : स्वीडन हा सर्वात मोठा स्कॅन्डिनेव्हियन देश आहे. स्वीडनमधील प्रमुख नद्यांचा उगम वायव्येकडील पर्वतश्रेणींमध्ये होतो आणि त्या नद्या दक्षिणेला बोयानियाच्या आखाताला मिळतात. स्वीडनची ५५ टक्के भूमी वनाच्छादित असून दक्षिण स्वीडनमधील जंगलांत बीच, ओक तसेच अन्य पानगळीचे वृक्ष आढळतात. स्वीडनमधील किरूना आणि गॅलिव्हरा या ठिकाणी उच्च प्रतीच्या मॅग्नेटाइट प्रकारच्या लोखंडाचे साठे आढळतात. नॉर्वेची राजधानी स्टॉकहोम ही आहे.
  • डेन्मार्क : डेन्मार्कच्या पश्चिमेला उत्तर समुद्र व आग्नेयला बाल्टिक समुद्र आहे. ग्रीनलंड हे जगातील सर्वात मोठे बेट व फेरो बेट डेन्मार्कच्या ताब्यात आहे. डेन्मार्कचे हवामान समशीतोष्ण प्रकारचे आहे. डेन्मार्कची अर्थव्यवस्था  प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, लोणी, चीज तसेच खारवलेले मांस यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. राजधानी कोपेनहेगन हे प्रमुख औद्योगिक केंद्र व मुख्य बंदर आहे.
  • स्पेन : स्पेन हा युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा उंचवटय़ावरील देश आहे. (स्वित्र्झलड हा पहिल्या क्रमाकांचा उंचवटय़ावरील देश आहे.) तागुस आणि एब्रो या स्पेनमधील महत्त्वाच्या नद्या आहेत. तागुस नदी पोर्तुगालमधून पुढे अटलांटिक महासागराला तर एब्रो नदी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. स्पेन ऑलिव्ह आणि कॉर्कचा जगातील महत्त्वाचा उत्पादक आहे. स्पेनची राजधानी माद्रिद आहे.
  • पोर्तुगाल : पोर्तुगालची राजधानी लिस्बन असून येथील हवामान भूमध्य समुद्रीय प्रकारचे आहे. अटलांटिक महासागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील वर्षभरचे तापमान सौम्य असते. पोर्तुगाल हा युरोपातील टंगस्टनचा अग्रगण्य उत्पादक आहे. कोळसा व तांब्याचे साठेदेखील येथे आढळतात. येथील पोटरे वाईन जगप्रसिद्ध आहे.

लेखन : डॉ. जी. आर. पाटील