नर्सिग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती-
गेल्या काही वर्षांत देशभरातील रुग्णालयांची संख्या वाढली. त्यामुळे प्रशिक्षित नर्सेसची गरजही वाढली. शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची भरती सातत्याने केली जाते. सुधारगृहे, वृद्धाश्रम, सैन्यदलाची रुग्णालये, शुश्रूषागृहे आणि परदेशातही नर्सिग क्षेत्रात नोकरी-करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन नर्सिग कौन्सिल आदी ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी व्यक्तिगत परिचारिकांनाही मोठी मागणी आहे. मात्र, प्रशिक्षित परिचारिकांची गरज आणि उपलब्धता याचे आज व्यस्त प्रमाण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नर्सिगचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीच्या संधी लगेचच उपलब्ध
होऊ शकतात.
प्रवेश प्रक्रिया : या क्षेत्रात येण्यासाठी बीएस्सी इन नर्सिग हा अभ्यासक्रम करावा लागतो. बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम बहुतेक सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.
बीएस्सी नर्सिग हा अभ्यासक्रम केल्यावर पदव्युत्तर पदवी स्तरावर स्पेशलायझेशन करता येते. हे स्पेशलायझेशन कार्डिओ थोरॅसिक नर्सिग, क्रिटिकल केअर नर्सिग, इमर्जन्सी अॅण्ड डिझास्टर नर्सिग, निऑनॅटल नर्सिग, न्युरो नर्सिग, नर्सिग एज्युकेशन अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन, ऑन्कॉलॉजी नर्सिग, ऑपरेशन रूम नर्सिग, ऑर्थोपेडिक अॅण्ड रिहॅबिलिटेशन नर्सिग, सायकियाट्रिक नर्सिग अशा क्षेत्रांमध्ये करता येते.
या क्षेत्रात पीएच.डी.सुद्धा करण्याची सुविधा काही संस्थांमध्ये आहे. असा उच्च अभ्यासक्रम केल्यावर नर्सिग महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करण्याची संधी मिळू शकते.
नर्सिग अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्था
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ- नाशिकस्थित या संस्थेमार्फत नर्सिग विषयाशी संबंधित पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. * बीएस्सी इन नर्सिग * बेसिक बीएसस्सी इन नर्सिग * फेलोशिप कोर्स इन ऑर्थोपेडिक अॅण्ड रिहॅबिलिटेशन इन नर्सिग * फेलोशिप कोर्स इन ऑपरेशनरूम नर्सिग * पोस्ट सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिग * सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिग
* एमएस्सी इन नर्सिग.
* बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिग- या संस्थेच्या बीएस्सी इन नर्सिग या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. प्रवेशपरीक्षेतील यशस्वी उमेदवारांना अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पत्ता- बॉम्बे हॉस्पिटल रिंगरोड इंदोर- ४५२०१०.
वेबसाइट- http://www.bombayhospitalindore.com
ई मेल- info@bhcollegeofnursing.com
* डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ)- या संस्थेच्या बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रमाला देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी- एआयईटी, या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. एकूण जागा ५०. ही परीक्षा मे महिन्यात नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैद्राबाद, नवी दिल्ली या केंद्रांवर घेतली जाते. अर्ज संस्थेच्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. पत्ता- ८६९, ई कसाबा बावडा, कोल्हापूर- ४१६००६.
ई मेल- info@dypatilunikop.org
* कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस- कऱ्हाड स्थित कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ)अंतर्गत कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग सायन्सेस या संस्थेमधील बॅचलर ऑफ नर्सिग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय सामायिक प्रवेश चाचणी मे महिन्यात मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये घेतली जाते. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. पत्ता- कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी कराड. वेबसाइट- http://www.kimsuniversity.in
ई मेल- contact@kimsuniversity.in
* भारती विद्यापीठ- भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नर्सिग (सांगली, पुणे आणि नवी मुंबई) येथे बीएस्सी- नर्सिग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पत्ता- भारती विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, दुसरा मजला, सीईटी डिपार्टमेंट, एलबीएस मार्ग, पुणे- ४११०३०.
वेबसाइट- http://www.bvunversity.edu.in
किंवा http://www.bharatividyapeethuniversity.net
* कोकिलाबेन धीरुभाई अंबानी कॉलेज- या संस्थेने बीएस्सी इन नर्सिग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ५० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. निवडीसाठी शासनाच्या सामायिक प्रवेश चाचणी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या असोशिएट सीईटीमधील गुणांचा आधार घेतला जातो. पत्ता- कोकिलाबेन हॉस्पिटल, चार बंगला, अंधेरी पूर्व,
मुंबई- ४०००५३. वेबसाइट- http://www.kdnursingcollege..
ईमेल- kdnursingcollege@relianceada.com
* खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिग अभ्यासक्रम- असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र या संस्थेमार्फत मेडिकल सामायिक प्रवेश चाचणी- असो. सीईटी साधारणत: मे महिन्यात घेतली जाते. या परीक्षेद्वारे ५३ नर्सिग महाविद्यालयांतील २२४० जागा भरण्यात येतात. (दरवर्षी यात वाढ होऊ शकते.) पत्ता- असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अॅण्ड कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र, एएमयूपीएमडीसी ऑफिस, श्रीजी हाऊस, ७५, मिंट रोड, फोर्ट,
मुंबई- ४००००१. मेल- contact@amupmdc.org
वेबसाईट- http://www.amupmdc.org
* अमृता विद्यापीठम- या संस्थेच्या स्कूल ऑफ नर्सिगमार्फत बॅचलर ऑफ नर्सिग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मे महिन्यात अमृतापुरी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, कोझिकोड, नवी दिल्ली, थिरुवनंतपूरम या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाते. अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. पत्ता- द अॅडमिशन, को-ऑर्डिनेटर, ऑफिस ऑफ द अॅडमिशन्स, अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एआयएमएस- पोनेक्करा, पोस्ट ऑफिस- कोची- ६८२०४१ केरळ. वेबसाइट- http://www.amrita.edu
ईमेल- ugadmissions@aims.amrita.edu
* इतर महाविद्यालये- * कस्तुरबा नर्सिग कॉलेज, वर्धा (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग) * सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिग, कोल्हापूर (अभ्यासक्रम- बेसिक बीएस्सी इन नर्सिग) * बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग) * सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ नर्सिग, पुणे (अभ्यासक्रम- पोस्ट बेसिक बीएस्सी इन नर्सिग) * मेट्रोपोलिटन एज्युकेशन ट्रस्टचे इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग, विलेपार्ले, मुंबई (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग) * गुरुनानक इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशन वांद्रे, मुंबई (अभ्यासक्रम- जनरल नर्सिग अॅण्ड मिडवाइफरी कोर्स) * लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिग, मरीन लाइन्स, मुंबई (अभ्यासक्रम- एमएस्सी इन नर्सिग) * जी.एस. मेडिकल कॉलेज, परळ, मुंबई (अभ्यासक्रम- डायलेसिस अॅण्ड ट्रान्सप्लान्टेशन फॉर नर्सेस)
* टेहमी ग्रँट इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशन, बंड गार्डन, पुणे (अभ्यासक्रम- बेसिक बीएस्सी इन नर्सिग) * श्रीमती बकूळ तांबट इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग एज्युकेशन, कर्वे रोड, पुणे. (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग) * आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग) * एम.जी.एम. युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नवी मुंबई (अभ्यासक्रम- बीएस्सी इन नर्सिग) * ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन, महालक्ष्मी, मुंबई (अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन फॉर नर्सेस) * शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मातृसेवा संघ नर्सिग कॉलेज (महाल मॅटर्निटी होम, कोठी रोड महाल, नागपूर- ४४०००२. या संस्थेत एएनएम हा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. प्रवेश अर्हता- दहावी उत्तीर्ण) * विद्याशिक्षण प्रसार मंडळाचे कॉलेज ऑफ नर्सिग अॅण्ड रिसर्च सेंटर, दिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर- ४४००१०.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2014 रोजी प्रकाशित
परिचारिका व्हायचंय?
नर्सिग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती-

First published on: 27-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wants to become a nurse