01 October 2020

News Flash

२०१७चे ‘छोटे अमित शहा..’

बन्सल हे मूळचे राजस्थानचे. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते.

  वाराणसीमध्ये मतदान केंद्रप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वाबरोबर भोजन घेतले होते. तेव्हा मोदींसोबत उत्तर प्रदेशचे संघटनमंत्री (डावीकडून पहिले) सुनील बन्सल

 

सुनील बन्सल.. अभूतपूर्व यशाचा पडद्यामागील शिल्पकार

र प्रदेश : अमित शहा

२०१५ बिहार : प्रशांत किशोर

आणि..

२०१७ उत्तर प्रदेश : सुनील बन्सल..

राजस्थान आणि उत्तर प्रदेशबाहेर माहीत नसलेले नाव. पण पक्ष संघटना आणि संघाच्या परिवाराच्या वर्तुळात चांगलीच उठबस. कोणी त्यांना ‘छोटे अमित शहा’ म्हणतात, तर कुणी त्यांना राजस्थानचे भावी मुख्यमंत्री!

सुनील बन्सल.. उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेश संघटनमंत्री. देशातील सर्वात शक्तिशाली राज्यामध्ये सव्वातीनशे जागांचा जो काही अभूतपूर्व, अविश्वसनीय विजय नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपने मिळविला आहे, त्याचा पडद्यामागचा शिल्पकार. २०१४मध्ये शहांनी जशी केवळ अविश्वसनीय कामगिरी (लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा) केली होती, तशीच ४०३पैकी ३२४ जागांची कामगिरी विधानसभेमध्ये करणाऱ्या ‘कोअर टीम’मधील सर्वाधिक प्रभावी नाव.

बन्सल हे मूळचे राजस्थानचे. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते. दिल्ली विद्यापीठामध्ये वारंवार हरणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या विजयाचा सिलसिला सुरू करणारे बन्सल यांना शहांनी हेरले आणि आपल्यासोबत २०१४च्या तयारीसाठी घेतले. पुढे शहा राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि मग उत्तर प्रदेशच्या रणनीती अंमलबजावणीची जबाबदारी बन्सल आणि राज्य प्रभारी ओम प्रकाश माथूर यांच्याकडे सोपविली गेली. गेली अडीच वर्षे माथूर आणि बन्सल ही जोडगोळी उत्तर प्रदेशात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती आणि त्याला जबरदस्त यश मिळाले. बन्सल यांच्याबरोबर काम केलेल्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा स्वभाव शहांशी खूपच मिळताजुळता आहे. जिद्दी आहेत, अफाट परिश्रमाची कायम तयारी असते, एकदा निर्णय घेतला की परिणामांची फिकीर करीत नाहीत. कोणालाही अंगावर घेऊ  शकतात. अगदी खासदार आणि आमदारांनाही जाब विचारण्यास मागेपुढे पाहत नाहीत. संघटनकौशल्य वादातीत आहे. त्यांचे वक्तृत्व प्रभावी आहे, पण जीभ बोचरी आहे. त्यांचे रोखठोक बोलणे अनेकांना डाचते.

२०१४मध्ये मोदींच्या विजयात वाटा असलेल्या प्रशांत किशोर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आणि बिहारमध्ये मोदी- शहांचे नाक कापल्यानंतर भाजपने रणनीतीकार आयात करण्याऐवजी पक्षातील नेत्यांनाच पुढे आणण्याची रणनीती आखली. त्यानुसार आसाममध्ये रजत सेठी आणि उत्तर प्रदेशात बन्सल यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. या दोन्ही ठिकाणी भाजपला चांगला फायदा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2017 2:53 am

Web Title: narendra modi bjp assembly election 2017 assembly election result 2017 uttar pradesh election result 2017
Next Stories
1 या ‘चाणक्या’मुळे उत्तरप्रदेशात भाजपला विजयश्री
2 लोकशाहीत भूलथापा देऊन मते मिळतात; अखिलेश यादव यांचा भाजपला टोला
3 Uttar Pradesh Assembly Election Results 2017: नोटाबंदीनंतरही उत्तरप्रदेशमध्ये ‘हर हर मोदी’
Just Now!
X