वसई : विरारमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी    ५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. विरार पूर्वेच्या रेल्वे स्थानकाजवळ मनवेलपाडा रस्त्यावर सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते.  काम संपवून मजूर हातपाय धुण्यासाठी गेले होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. खड्डय़ामध्ये भिंत आणि बाजूचा मुरूम कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत साहूबाई सुळे (४५), लक्ष्मीबाई गवाणे (४५) आणि राधाबाई नवघरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदाबाई नवघरे (३२) ही महिला जखमी झाली. तिच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सर्व मृत हे नाका कामगार असून मूळचे मराठवाडय़ातील आहेत.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव

बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा

चिराग दोशी या बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या दुर्घटनेबद्दल बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार भारत पटेल यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.