scorecardresearch

पोलिसांची सर्वोत्तम कामगिरी ; मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे चालू वर्षांत दोषसिद्धीचे प्रमाण ६० टक्के

विशेष म्हणजे मागील वर्षांत आयुक्तालयीतल दोषसिध्दीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजे ८९ टक्के एवढे होते

पोलिसांची सर्वोत्तम कामगिरी ; मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे चालू वर्षांत दोषसिद्धीचे प्रमाण ६० टक्के
मीरा -भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय

वसई : गुन्हा उघडकीस आणल्यानंतर भक्कम पुरावे न्यायालयात सादर करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात मीरा -भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय या वर्षी देखील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. चालू वर्षांतील पहिल्या आठ महिन्यांत आयुक्लालयातील गुन्ह्यंच्या दोषसिद्धीचे प्रमाण ६० टक्कय़ांहून अधिक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षांत आयुक्तालयीतल दोषसिध्दीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजे ८९ टक्के एवढे होते.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने गुन्ह्यतील आरोपींना न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पुरावे कसे गोळा करावे याबाबचे मार्गदर्शन सातत्याने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडून केले जात होते.  त्याचा सकारात्मक परिणाम यंदाही दिसून आला.  दोषसिद्धीत आयुक्तालाय राज्यात अव्वल ठरले होते. यंदा देखील आयुक्तालय राज्यात अव्वल ठरेल असा विश्वस पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 न्यायालयातून पुराव्या अभावी सुटलेल्या १० प्रकरणांचा अभ्यास दरवर्षी करून त्यातील त्रुटी तपासल्या गेल्या. न्यायालयात पैरवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करम्ण्यात आली. प्रत्येक प्रकरणात साक्षीदारांना न्यायालात आणण्याचे काम हा अधिकारी करत होता. त्यामुळे साक्षादारांचे भक्कम पाठबळ मिळू लागले आणि गुन्हे न्यायालयात सिद्ध होऊ  लागले.

८ महिन्यातील दोषसिद्धी

एकूण खटले—   १,२८१

दोषसिद्धी—     ६३६

तडजोड—      १९८

निर्दोष—        ४३७

टक्के— ६०

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या