भाईंदर : विकासकांकडून कर आकारणी करण्यासाठी आता पालिकेने वास्तुविशारदांना जबाबदारी दिली आहे. विकासकांकडून करवसुली न झाल्यास वास्तुविशारदांकडून आलेल्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही. करोनामुळे मीरा-भाईंदर महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी विविध मार्गानी उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. करवसुलीवर भर दिला असून चालू आर्थिक वर्षांच्या मालमत्ता कराची देयके तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आली असून उत्पन्न वाढविले जात आहे. दुसरीकडे पालिकेच्या उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोकळय़ा जागेच्या कर भरण्याकडे विकासकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे मोकळय़ा जागेची थकबाकी ८२ कोटी ३४ लाखांच्या वर गेली आहे. या कराची वसुली करण्याकरिता पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शक्कल लढवली  आहे.

विकासकांच्या प्रकल्पांची कामे वास्तुविशारद करत असतात. त्यामुळे या विकासकांकडून करवसुली करण्याची जबाबदारी वास्तुविशारदांवर देण्यात आली आहे. आयुक्तांनी नुकतीच शहरातील निवडक वास्तुविशारदांची बैठक घेतली. ज्या विकासकांनी कर भरला नाही अशांची यादी काढून त्याच्या वसुलीचे काम वास्तुविशारदांना देण्यात आले आहे. या कामात पालिकेला मदत न केल्यास  आगामी काळात अशा वास्तुविशारदांची  कोणत्याही स्वरूपाची नकाशामंजुरीची (प्लॅन) कामे पास न करण्यात येणार नसल्याची ताकीद देण्यात आली आहे, अशी माहिती नगररचनाकार हेमंत ठाकूर यांनी दिली.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

मोकळय़ा जागेची थकबाकी वसूल करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे  अशा थकबाकीधारक विकासकांची व त्यांच्या वास्तुविशारदांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार वास्तुविशारदांनी थकबाकी वसूल करण्यात सहकार्य न केल्यास त्यांचे प्लॅन मंजूर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका