औद्योगिक वसाहतीत घाणीचे साम्राज्य

मागील आठवडय़ात वादळाने आलेल्या पावसाने नागरी वसाहतीबरोबर औद्योगिक वसाहतींनासुद्धा त्याचा फटका सहन करावा लागला आहे.

विरार :  मागील आठवडय़ात वादळाने आलेल्या पावसाने नागरी वसाहतीबरोबर औद्योगिक वसाहतींनासुद्धा त्याचा फटका सहन करावा लागला आहे. पावसानंतर पालिकेकडून या विभागात साफसफाई नियमित होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणी आणि दरुगधीमुळे येथील कामारागांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठवडा उलटूनही साफ सफाईची कामे होत नाल्सायाने येथील कामगारांनी नागजी व्यक्त केली आहे.

मागील आठवडय़ात आलेल्या वादळाने वसईच्या औद्योगिक परिसरात मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण केले. तसेच अनेक भागात पावसाचे पाणी बरेच दिवसा साचून राहिल्याने डबके तयार झाले आहेत. यामुळे या दाबक्यांवर दासांची पैदास होत आहे. तर अनेक भागातील कचरा उचलला गेल्या नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. यातून दुर्गधी पसरत आहेत. कचर्यामध्ये भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे या परिसारत राहणाऱ्या आणि कामावर येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या टाळेबंदी असल्याने रहिवाशी कामगारांवर अनेक छोटे मोठे कारखाने सुरू आहेत, त्यातही काही कामगारांना अत्यावश्यक सेवेसाठी आपल्या घरून कामावर जावे लागत आहे. यात कामगारांना या दुर्गधी आणि घाणीच्या विळख्यात वावरावे लागत असल्याचे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात येथील कारखानदारांनी पालिकेला अनेक वेळा तोंडी विनवण्या केल्या आहेत. पण केवळ काम आज उद्या केले जाईल अशी आश्वासने दिली जात असल्याची माहिती धुमाळ नगर परिसरातील कारखानदार युसुफ पटेल यांनी दिली.

वसई विरारच्या औद्योगिक परिसरात ३ हजारहून अधिक छोटे मोठे कारखाने, कंपन्या आहेत सध्या निम्म्या कामगाराच्या मदतीने शेकडो कारखाने सुरु आहेत. औद्योगिक वसाहतीतील गोलानी, चिंचपाडा, सातीवली, धुमाल नगर, अग्रवाल, भोयदापाडा, वसई फाटा, नवजीवन, वालीव, रेंज नाकासारखीच परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपासून या परीसतात पालिकेकडून साफ सफाईची कामे केली जात नाहीत. यामुळे हजारो कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमित साफसफाईची मागणी आता नागरिक करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Empire of dirt industrial colony ssh